Tuesday, July 14, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळराज्य अर्थसंकल्पातून आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मतदारसंघात २५ कोटींचा निधी...

राज्य अर्थसंकल्पातून आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मतदारसंघात २५ कोटींचा निधी मंजूर…

कुडाळ मालवण, पणदूर घोटगे, कसाल मालवण, तळाशील तोंडवळी सारख्या महत्वाच्या रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर…!

 

कुडाळ | प्रतिनिधी 

 

आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे राज्य अर्थसंकल्पातुन कुडाळ मालवण मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती व पूल बांधकाम करणे या कामांसाठी एकूण २५ कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यात पणदूर घोटगे रस्ता रा. मा. १७९ रस्ता डांबरीकरण करणे या कामासाठी ४ कोटी ५० लाख, नेरूर जकातनाका मानकादेवी MDR ४६ रस्ता डांबरीकरण करणे २ कोटी ५० लाख, चौके धामापूर काळसे MDR ४१ रस्ता डांबरीकरण करणे २ कोटी ५० लाख, पावशी घावनळे रस्ता डांबरीकरण करणे ५० लाख, तेंडोली माड्याचीवाडी MDR ४९ रस्ता डांबरीकरण करणे ५० लाख, हळदीचे नेरूर ब्रिज बांधकाम करणे या कामासाठी ४ कोटी ९३ लाख, मालवण कसाल रा. मा. १८२ रस्ता डांबरीकरण करणे २ कोटी ५० लाख, वायरी तारकर्ली देवबाग MDR २८ रस्ता डांबरीकरण करणे १ कोटी, कावा ते पेंडूर नांदोस MDR- ३४ रस्ता डांबरीकरण करणे १ कोटी, मसुरे बागायत चौके MDR ५२ रस्ता डांबरीकरण करणे २ कोटी, तोंडवळी तळाशील MDR ५२ रस्ता डांबरीकरण करणे २ कोटी, राठीवडे ओसरगाव MDR- २९ रस्ता डांबरीकरण करणे १ कोटी असा एकूण २५ कोटींचा निधी मंजूर झाला असून खड्डेमय झालेल्या रस्त्यांचे नूतनीकरण होणार आहे. 

एकूण ११ रस्ते आणि एका पुलासाठी मंजूर झालेला २५ कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यात खर्ची होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!