Sunday, June 21, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळडॉ.वजराटकरांच्या सेवेचा लाभ जिल्हावासियांना यापुढेही मिळावा...! निरोप समारंभात सर्वच वक्त्यांनी व्यक्त केल्या...

डॉ.वजराटकरांच्या सेवेचा लाभ जिल्हावासियांना यापुढेही मिळावा…! निरोप समारंभात सर्वच वक्त्यांनी व्यक्त केल्या भावना…!

कुडाळ (प्रतिनिधी )

प्रसिद्ध शल्यचिकित्सक आणि सावंतवाडी उप -जिल्हा रुंग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग वजराटकर हे नियत वयोमानानुसार ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत.

यापूर्वी त्यांनी कुडाळ ग्रामीण रुंग्णालय,वेंगुर्ले ग्रामीण रुंग्णालय येथेही वैद्यकीय अधिक्षक म्हणून अनेक वर्ष काम केले आहे.

डॉ. वजराटकर यांचे चिरंजीव डॉ. अनिकेत आणि त्यांची पत्नी डॉ. मोनालिसा हे दोघेही शल्यचिकित्सक असून सिंधुदुर्गनगरीतील सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देत आहेत.

दरम्यान वजराटकर हे शासकीय सेवेतून निवृत्त होतं असले तरीही त्यांनी केलेली रुंग्णांची सेवा ही खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ यापुढेही सावंतवाडीकरांना, जिल्हावासियांना मिळावा अशी अपेक्षा सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष ऍड. अनिल निरवडेकर व अन्य वक्त्यांनी त्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी व्यक्त केली.

सावंतवाडी उप -जिल्हा रुंग्णालयाचे डॉक्टर्स,परिचारिका, आणि कर्मचाऱ्यांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका छोटेखानी समारंभात त्यांना शाल व श्रीफळ देऊन निरोप देण्यात आला. या समारंभाला त्यांच्या पत्नी मोहिनी वजराटकर याही उपस्थित होत्या.

या निरोप समारंभात ऍड. निरवडेकर, एसएसपीएम लाईफ टाईम रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. आर.एस.कुलकर्णी,रुंग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रमेश कर्तस्कर, निवृत्त वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम पाटील, कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, जि. प. चे माजी अध्यक्ष काका कुडाळकर, डॉ. शंतनू तेंडुलकर, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, राजू मसुरकर, डॉ. अभिजित चितारी, डॉ. गिरीशकुमार चौगुले,डॉ.अमोल पावस्कर,भास्कर केरवडेकर,डॉ.अनिकेत वजराटकर आदी उपस्थित होते.

रुग्णांशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते ठेवणारा, रुग्णांशी संवाद साधणारा, रुग्णसेवेचा आदर्श निर्माण करणारा सेवाभावी डॉक्टर अशा शब्दात अनेक वक्त्यांनी त्यांचे कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!