कुडाळ | प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील वेताळ बांबर्डे पुलावर आज संध्याकाळी ७.२० च्या सुमारास भरधाव कारचा अपघात झाला. या अपघातात कारचे (एम एच ०९ जी झेड ५९८६) मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झाले नाही. महामार्गावरील वेताळ बांबर्डे आणि पणदूर सीमेवरील पुलाची एक बाजू अरुंद असल्याने अपघाताचे केंद्र बनले आहे. मागील आठवड्यात याच ठिकाणी कारचा अपघात घडला होता. येथील अरुंद बाजू अपघाताचे मुख्य कारण आहे.


