Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळआमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पावशी विभागाच्या वतीने विविध उपक्रमांमध्ये...

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पावशी विभागाच्या वतीने विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे जिल्हा परिषद सदस्य दादा साईल यांचे आवाहन..

यानिमित्ताने महारक्तदान शिबिर तसेच पावशी विभागातील सर्व गावातील मंदिरामध्ये अभिषेक आणि विशेष पूजेचे होणार आयोजन

 

कुडाळ | प्रतिनिधी 

 

आमदार निलेश राणे यांच्या १७ मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त पावशी विभागाच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शिवसेना पावशी विभागाची विशेष बैठक आज पणदूर येथील शिवसेना शाखा कार्यालयात संपन्न झाली. 

या बैठकीत आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक 17 मार्च रोजी विभागातील सर्व ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये अभिषेक व पूजनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. तसेच गरजवंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर विभागातील युवा सेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले आहे. याचबरोर विभागातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटपाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे निलेश राणे साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने पणदूर येथे दिनांक 20, 21, 22 मार्च रोजी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे देखील आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांमध्ये पावशी विभागातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य दादा साईल यांनी केले. 

या बैठकीत मार्गदर्शन करताना विभाग प्रमुख नागेश परब यांनी येणाऱ्या काळात संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक गावात भेट देऊन शाखाप्रमुख नियुक्ती व शाखा बांधणी पूर्ण करण्याचे तसेच मंजूर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन करणार असल्याचे स्पष्ट केले.

या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य दादा आली, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, विभाग प्रमुख नागेश परब, उपतालुका प्रमुख अरुण सावंत, पंचायत समिती सदस्य निखिल कांदळगावकर, महिला तालुकाप्रमुख वैशाली पावसकर, महिला विभाग प्रमुख मृणाल परब, उपविभाग प्रमुख गजानन कुलकर्णी, सदा अणावकर, कुबल गुरुजी, शेखर गोसावी, सर्व शाखाप्रमुख, पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पणदूर शाखाप्रमुख बबन निर्गुण यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!