Tuesday, July 14, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडी'एसएसपीएम मेडिकल कॉलेज'चा पहिला पदवीदान सोहोळा थाटात संपन्न...!

‘एसएसपीएम मेडिकल कॉलेज’चा पहिला पदवीदान सोहोळा थाटात संपन्न…!

स्वप्नपूर्तीने विद्यार्थी -पालक आणि खुद्द नारायण राणे झाले भावुक…! 

 

कसाल (प्रतिनिधी)

पडवे येथील ‘एसएसपीएम मेडिकल कॉलेज’च्या २०२० च्या ‘एमबीबीएस’च्या पहिल्याच ‘बॅच ‘चा दीक्षांत सोहोळा काल अतिशय उत्साही वातावरणात मोठया दिमाखात आणि अत्यंत भावुक वातावरणात संपन्न झाला.

            वैद्यकीय क्षेत्रातील खडतर प्रवासाचे सार्थक झाले याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते. समाजसेवेची शपथ घेताना तर या नवोदित डॉक्टरांचे डोळे अक्षरशः पाणावले.

              वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूपाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘डॉक्टर्स’ निर्माण करावेत हे स्वप्न संस्थेचे संस्थापक विश्वस्थ, खासदार नारायण राणे यांनी उराशी बाळगले होते. ते स्वप्न आज पूर्ण होत आहे या आनंदाने ते इतके भारावले की त्यांचे डोळे पाणावले. वैद्यकीय महाविद्यालय आणि ‘लाईफ टाईम हॉस्पिटल ‘च्या रूपाने आपण जे बीज पेरले त्याचे आज ‘वटवृक्षात’ रूपांतर झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वहात होता. ‘मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटल’च्या भव्य संकुला समोरील मैदानात उभारण्यात आलेल्या एका भव्य मंडपात हा पदवीदान सोहळा संपन्न झाला.

                      या कॉलेजचे 143 नवोदित डॉक्टर आता रुग्णसेवेसाठी सज्ज झाले असून शपथग्रहण सोहळ्याला प्रत्येकाचे पालक आणि कुटुंबीय उपस्थित होते. शपथ ग्रहणाच्या वेळी पालक वर्ग आणि उपस्थित असलेले त्यांचे कुटुंबीय अत्यंत भाऊक झालेले दिसत होते. 

              या सोहळ्याला संस्थेच्या अध्यक्षा राणे यांच्या पत्नी सौ.नीलम राणे,सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि संस्थेचे सचिव नितेश राणे,महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.अजय चंदनवाले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जि प. उपाध्यक्ष दादा साईल, मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ.वंदना गावपांडे,वैद्यकीय अधिक्षक अशुतोष पोदार,सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे, प्रशासकीय अधिकारी शुभम तांबे,डॉ.आर. एस. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

                          या शपथग्रहण सोहळ्या नंतर सर्व विद्यार्थ्यांना ‘मेडल’, ‘सन्मानचिन्ह’ आणि ‘प्रमाणपत्र ‘ देऊन गौरविण्यात आले. या सोहोळ्यात जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जि.प.चे उपाध्यक्ष दादा साईल,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे यांचा संस्थेच्या वतीने शाल -श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

   विद्यार्थ्याचे भावुक भाषण…!

                      ‘माझ्या आई-बाबांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. हे स्वप्न नारायण राणे यांच्यामुळेच आज पूर्ण झाले आहे. या कॉलेजच्या पहिल्या ‘बॅच’चा विद्यार्थी होण्याचा मान मला मिळाला.संस्थेच्या अध्यक्षा नीलम ताईने आम्हा प्रत्येक विद्यार्थ्यांची काळजी घेतली.शिक्षक वर्गानेही खूप मेहनत घेतली आणि आम्हाला घडवलं असे भाऊक उदगार विद्यार्थी डॉ. सुयश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने बोलताना काढले.

              ‘आम्हाला देव माहिती नाही,मात्र राणे साहेबांच्या रूपात आम्ही देव माणूस पाहिला. या मेडिकल कॉलेजमध्ये सर्वोत्तम शिक्षण मिळत आहे अशा या कॉलेजमध्ये आमची मुलं डॉक्टर झाली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,असे उद्गार लातूरच्या एका विद्यार्थ्याच्या पालकाने काढले. यावेळी त्यांनी पालकाने राणे परिवाराचे आणि कॉलेज व्यवस्थापनाचे कौतुक करत त्यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!