Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळमध्ये 'हाऊस ऑफ आईस्क्रीम'चा थाटात शुभारंभ..

कुडाळमध्ये ‘हाऊस ऑफ आईस्क्रीम’चा थाटात शुभारंभ..

‘लाईव्ह आईस्क्रीम’ ठरतेय आकर्षणाचे केंद्र!

 

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे व्यापारी केंद्र असलेल्या कुडाळ शहरात आता खऱ्या अर्थाने आईस्क्रीम प्रेमींची चंगळ होणार आहे. कुडाळ मध्ये आशीर्वाद अव्हेन्यू येथे ‘हाऊस ऑफ आईस्क्रीम’ या अद्ययावत आईस्क्रीम पार्लरचा भव्य शुभारंभ गुरुवारी मोठ्या उत्साहात आणि आईस्क्रीम प्रेमींच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला.

    या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. टॅक्स कन्सलटंट भूषण तेजम, उद्योजक चेतन मंडोलकर, आर्किटेक्ट अभिषेक माने, उद्योजक आणि रंगकर्मी केदार देसाई आणि व्यावसायिक महेश राऊळ यांसारख्या प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते आणि उपस्थितीत या नवीन दालनाचा फित सोडून शुभारंभ झाला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी या नवीन व्यवसायाला शुभेच्छा दिल्या. शुभारंभ प्रसंगी ज्येष्ठ नागरिक अरविंद शिरसाट, पत्रकार अजय सावंत, नॅशनल इन्शुरन्सचे कमरुद्दीन खान, जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी श्री. नाबर, आकाशवाणीचे अधिकारी श्री. परब, हाऊस ऑफ आईस्क्रीमचे संचालक हर्षवर्धन जोशी, सौ. कविता जोशी, निलेश जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

    या पार्लरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘लाईव्ह आईस्क्रीम’. ग्राहकांच्या आवडीच्या कोणत्याही ताज्या फळापासून त्यांच्या डोळ्यांदेखत अवघ्या काही मिनिटांत आईस्क्रीम तयार करून दिले जाते. यामध्ये कोणतेही कृत्रिम रंग किंवा प्रिझर्व्हेटिव्ह्ज न वापरता नैसर्गिक चवीला प्राधान्य देण्यात आले आहे.

आईस्क्रीम सोबतच येथे विविध प्रकारचे कॉकटेल, रंगबेरंगी मॉकटेल, थंडावा देणारे मोहितो असे अनेक चविष्ट प्रकार उपलब्ध आहेत, जे कुडाळकरांच्या जिभेवर रेंगाळत राहतील.

    कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, कुडाळसारख्या वाढत्या शहरात अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांची गरज आहे. ‘लाईव्ह आईस्क्रीम’ ही संकल्पना पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना नक्कीच आकर्षित करेल. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी कुडाळकरांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. मोक्याच्या जागेमुळे आणि प्रसन्न वातावरणामुळे ‘हाऊस ऑफ आईस्क्रीम’ हे शहरवासीयांचे आवडीचे ठिकाण बनेल, असा विश्वास जोशी परिवाराने यावेळी व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!