Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळभविष्यात बचत गटाच्या माध्यमातून एक सहकार उभा करूया - आमदार निलेश राणे

भविष्यात बचत गटाच्या माध्यमातून एक सहकार उभा करूया – आमदार निलेश राणे

कुडाळ | प्रतिनिधी 

महिला बचत गटानी उत्पादित  केलेल्या बाजार मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करतानाच भविष्यात बचत गटाच्या माध्यमातून एक सहकार उभा करूया असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे केले

    

माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहर शिवसेनेच्यावतीने कुडाळ नगरपंचायतीमध्ये दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत नोंदणीकृत झालेल्या महिला बचत गटांसाठी आज महालक्ष्मी हॉल येथे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले यावेळी  शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना जिल्हा महिला प्रमुख दीप्ती पडते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, सभापती मिलिंद नाईक, मालवण उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, तालुका प्रमुख दीपक नारकर, कुडाळ शहर प्रमुख अभि गावडे, जिल्हा परिषद सदस्य  रुपेश कानडे, गटनेता विलास कुडाळकर, देवेंद्र नाईक, निखिल कांदळगावकर, नगरसेवक ॲड. राजीव कुडाळकर, महिला शहर प्रमुख श्रुती वर्दम, नगरसेविका चांदणी कांबळी, नयना मांजरेकर, चेतन पडते, रेवती राणे, राकेश कांदे, मंगेश चव्हाण, वैशाली पावसकर, संजय भोगटे, रेखा काणेकर, महिला बचत गट आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

    

यावेळी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले महिला बचत गटासाठी कुडाळ शहर प्रमुख ,नगरसेवक अभी गावडे यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला मी खरोखरच त्यांचे कौतुक यासाठी करतो की ,ते जे उपक्रम घेतात ते उपक्रम समाजोपयोगी असतात समाजाला त्याच्यातून काहीना काहीतरी फायदा होत असतो आणि त्याच्यामध्ये राजकीय हेतू नसतो  आज जे महिला बचत गट  वेगवेगळे प्रॉडक्ट बनवत असतील त्याच्यासाठी मला यासाठी एक उदाहरण आठवलं ते म्हणजे आयटीसी कंपनी जागतिक दर्जाची कंपनी असून अडीचशे प्रॉडक्ट बनवतात पण त्याचे ब्रँडिंग एक आहे आपण शिवसेनेच्या माध्यमातून  बचत गटासाठी पॅकेजिंग आणि मार्केटिंगची व्यवस्था जर  करून देऊ शकलो तर खरोखरच ती फार मोठी एक व्यवस्था त्यांच्यासाठी आपण करू शकतो व्यवसाय उभा करताना कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा बँकेशी निश्चितच चर्चा करू 

महिला बचत गटाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी  शिवसेनेच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्न केले जातील भविष्यात आपण बचत गटाच्या माध्यमातून एक सहकार उभी करूयाअसे सांगत आज जे काय आम्ही बोललो हे फक्त बोलण्यासाठी बोललेलो नाही तर येणाऱ्या महिन्याभरामध्ये तुम्हाला ते अस्तित्वात उतरताना दिसेल एवढंच या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना शब्द देतो असे सांगितले 

   शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले कुडाळ शहरात या बचत गट मेळाव्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या मार्गदर्शनानुसार कार्यरत महिला 

बचत गटांपैकी किमान दहा बचत गट तरी सुरुवातीला अपडेट करून मार्केटसाठी प्रयत्न केल्यास यश दूर नाही यासाठी किमान दहा बचत गट  मॉडेल म्हणून पुढे आणूया असे सांगितले. या महिला बचत गटांना उमेदचे गणेश राठोड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुडाळ शहर प्रमुख अभि गावडे यांनी केले सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले. तर आभार नगरसेविका चांदणी कांबळी यांनी मानले.

 

 

फोटो 

कुडाळ शहर शिवसेना आयोजित महिला बचत गटांच्या मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन करताना आमदार निलेश राणे आधी मान्यवर 

महिला बचत गटांच्या मार्गदर्शन शिबिराला उपस्थित महिला 

छाया प्रथमेश जाधव

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!