महामार्ग पोलिसांनी केली कारवाई, दोन्ही चालकांवर गुन्हे दाखल
पावशी येथील मेहनील वाटवे यांच्यामुळे अनर्थ टळला
सिंधुदुर्ग
महामार्गावर भरधाव वेगाने इतर वाहनांना हुलकावणी देत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन मल्टी एक्सेल ट्रक चालकांवर महामार्ग पोलिसांनी ओसरगाव येथे पकडून गुन्हा दाखल केला. हे दोन्ही चालक दारू पिऊन भरधाव वेगाने ट्रक चालवत होते.
मुंबई गोवा महामार्गावर भरधाव वेगाने दोन मल्टी एक्सेल ट्रक एका मागे एक असे होते हे ट्रक इतर वाहनांना हुलकावणी देत मुंबईच्या दिशेने जात होते दरम्यान पावशी येथील वाटवे क्रेनचे मालक मेहनील वाटवे हे त्याच दिशेने जात असताना या ट्रक चालकांचा पराक्रम पाहिला आणि त्यांच्या सुद्धा मनात धडकी बसली त्यांनी या ट्रकांचा पाठलाग केला त्यांचा नंबर घेतला वाहतूक पोलीस रुपेश सारंग यांना याबाबतची माहिती दिली त्यांनी तात्काळ वाहतूक पोलीस कार्यालयाशी संपर्क साधला आणि त्यांना ओसरगाव टोल नाका येथे महामार्ग पोलिसांनी थांबवले त्यांची तपासणी केली तर हे दोन्ही चालक दारू पिऊन ट्रक चालू होते हे निदर्शनाखाली त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत हडकर, यांच्यासह अमोल महाडिक, कैलास ढोले, सुरज ठाकूर, महादेव साबळे, कुंडलिक वानोळे यांनी ही कारवाई केली.


