Sunday, June 21, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळधनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी न्यायालयाने सुनावली शिक्षा

धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी न्यायालयाने सुनावली शिक्षा

कुडाळ | प्रतिनिधी

कणकवली येथील त कॅथॉलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला दिलेल्या धनादेशाचा अनादर केल्या प्रकरणी कणकवली येथील गोपाळ सुधाकर मुसळे यांना कणकवली येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सहा महिन्याचा साधा कारावास व रक्कम रुपये ३२ हजार रुपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे. याप्रकरणी बँकेच्या वतीने ॲड. अमोल अशोक मालवणकर व ॲड. सुरेंद्र तेली काम पाहिले.

कणकवली येथील गोपाळ सुधाकर मुसळे यांनी कॅथॉलिक अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. सावंतवाडी, शाखा कणकवली यांचेकडून व्यवसायासाठी रक्कम रु. ५०‌ हजार रुपयांचे कर्ज घेतलेले होते. सदर कर्जाच्या रक्कमेची अंशतः परतफेड करण्याकरीता गोपाळ सुधाकर मुसळे यांने पतसंस्थेस बैंक ऑफ महाराष्ट्र, शाखा कणकवली’ चा चेक क्रमांक ०२२१६२ चा दिनांक २४ जुलै २०१७ रोजीचा रक्कम रुपये २४ हजार रुपयाचा चेक दिलेला होता. परंतू आरोपी वाचे खात्यामध्ये पुरशी रक्कम नसल्यामुळे सदरचा चेक रिटर्न मेमोसहित चेक परतीच्या टिपणीने दिनांक २५ जुलै २०१७ रोजी परत आलेला होता. सदरचे चेक अनादरीत होवुन परत आलेला होता.

त्यामुळे फिर्यादी कॅथॉलिक अर्बन को- ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. सावंतवाडी, शाखा कणकवली यांनी आपले वकीलांमार्फत दिनांक १६ ऑगस्ट २०१७ रोजी रजिस्टर्ड मागणी नोटीस पाठविली तरी देखील मुदतीत आरोपीने सदर चेकची रक्कम फिर्यादीकडे जमा केलेली नाही. त्यामुळे गोपाळ सुधाकर मुसळे यांचेविरुध्द कॅथॉलिक अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. सावंतवाडी, शाखा कणकवली यांनी कणकवली कोर्टात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट चैप्टर १७ चे कलम १३८ प्रमाणे फिर्याद दाखल केलेली होती. सदर केसच्या कामी फिर्यादी पतसंस्थेतर्फे व्यवस्थापक यांचा जबाब होवून गोपाळ सुधाकर मुसळे हा चेकची रक्कम कायदेशीररित्या फिर्यादी पतसंस्थेस देणे लागत असून त्याकरीता सदरचा चेक दिलेला होता. व तो अनादरीत झालेला होता व त्यामुळे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट चॅप्टर १७ चे कलम १३८ प्रमाणे गुन्हा केलेला आहे, ही बाब फिर्यादी यांनी त्यांचे वकीलांमार्फत न्यायालयात शाबीत केलेली आहे. असा युक्तीवाद फिर्यादी पतसंस्थेचे वकील ॲड. अमोल मालवणकर यांनी केला फिर्यादी यांचे वकीलांचा युक्तीवाद ग्राहय मानून सहा महिन्याचा साधा कारावास व रक्कम रुपये ३२ हजार रुपये इतका दंड ठोठावण्यात आला. ही रक्कम ३० दिवसाच्या आत भरावी. तशी रक्कम न भरल्यास ६ महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा कणकवली प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सुनावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!