कुडाळ नगरपंचायतीमध्ये आरक्षण सोडत जाहीर

0

पथ विक्रेता सदस्य समितीची निवडणूक कार्यक्रम 

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ नगरपंचायत हद्दीतील पथ विक्रेता सदस्य समिती करण्यात येणार असून यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे या निवडणूक कार्यक्रमापैकी प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत झाली यामध्ये आठ जागा असून त्यामधील तीन जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.

कुडाळ नगरपंचायत हद्दीतील पथ विक्रेता यांच्यासाठी कायदा तयार करण्यात आला असून त्यांच्या न्याय हक्कासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे यासाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीतून समिती सदस्य म्हणून आठ सदस्य निवडले जाणार आहेत याबाबत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत ही निवडणूक होणार आहे यासाठी आज (शुक्रवार २३ ऑगस्ट) रोजी आरक्षण सोडत कुडाळ नगरपंचायत येथे झाली यावेळी सहाय्यक निबंधक सुनील मरभळ, कर निरीक्षक पठाण, निलेश म्हाडेश्वर, कुमारी पिंगुळकर तसेच पथ विक्रेते उपस्थित होते. कुडाळ शहरांमध्ये नगरपंचायत प्रशासनाकडे २३४ पथ विक्रेत्यांची नोंदणी असून हे या निवडणुकीत मतदार असणार आहेत.

या आरक्षण सोडतीमध्ये तीन जागा महिलांसाठी राखीव झाले आहेत त्यामध्ये सर्वसाधारण १, इतर मागासवर्ग १, विकलांग किंवा दिव्यांग १ तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्यांक या प्रवर्गातील जागा सर्वसाधारणसाठी राखीव झाले आहेत.