Monday, July 20, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळलायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गचा पदग्रहण सोहळा शनिवारी सायंकाळी महालक्ष्मी हॉल कुडाळ...

लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गचा पदग्रहण सोहळा शनिवारी सायंकाळी महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे श्री सर्जेराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात पार पडला…

कुडाळ |प्रतिनिधी 

सामाजिक बांधिलकी जोपासून लायन्स क्लब ऑफ कुडाळचे समाजातील कार्य कौतुकास्पद आहे .हाच समाजसेवेचा आलेख अधिक उंचावत ठेवून समाजात आपले वेगळी प्रतिमा निर्माण करा असे प्रतिपादन लायनचे पदग्रहण अधिकारी

एम जे एफ सर्जेराव पाटील (कोल्हापूर) यांनी लायन्स पदग्रहण सोहळ्यात केले 

    लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गचा पदग्रहण सोहळा शनिवारी सायंकाळी महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे श्री सर्जेराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात पार पडला 

यावेळी नूतन अध्यक्ष स्नेहा नाईक सचिव स्नेहांकिता उर्फ शोभा माने, खजिनदार अस्मिता बांदेकर ,सीए अजित फाटक, अँड अजित भणगे ,सीए सागर तेली ,ॲड श्रीनिवास नाईक, झोन चेअरमन अनुष्का चव्हाण ,अमेय पै, आनंद कर्पे ,जीवन बांदेकर, अनंत शिंदे, प्रकाश नेरुरकर, अँड समीर कुळकर्णी ,जयश्री पाटील, सुनेत्रा फाटक, नयन भणगे ,डॉ मिलिंद बोर्डवेकर, नवीन सदस्य नंदकिशोर गावडे अँड उमा सावंत, ऋषिकेश महाजन, प्रदीप नाईक ,तसेच सावंतवाडी मालवण कणकवली येथील लायन्स क्लबचे पदाधिकारी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे पदाधिकारी आदी उपस्थित होते 

  यावेळी बोलताना श्री पाटील म्हणाले लायन्स क्लब ऑफ कुडाळ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी विविध लक्षवेधी उपक्रम राबवले जातात . हा सर्वात जुना क्लब असून या क्लबने सामाजिक शैक्षणिक क्रीडा आरोग्य क्षेत्रात राबवलेले उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत. भविष्यात सामाजिक बांधिलकी जोपासून समाजसेवेचा प्रवास अखंडीत सुरू ठेवावा असे सांगितले. नूतन अध्यक्ष स्नेहा नाईक यांनी लायनचे प्रांतपाल लायन राजेंद्र शहा यांनी दिलेला “रंजन “कृती आराखडा आमच्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शक ठरेल या रंजन कृती आराखड्या अंतर्गत आम्ही भविष्यात सर्वांच्या सहकार्याने आरोग्यशिबिरे  महिला सक्षमीकरण वाहन चालकांसाठी आरोग्य तपासणी विद्यार्थी वर्गासाठी व्यक्तिमत्व विकास व मार्गदर्शक उपक्रम तसेच झाडे लावा झाडे जगवा अंतर्गत वृक्षारोपण अशा विविध उपक्रमाचे आयोजन करणार आहोत लायन्स ही केवळ संस्था नाही तर सेवा मैत्री आणि माणुसकी जपणारे एक कुटुंब आहे. आपण सर्वांनी एकजुटीने काम केलं तर कोणतेही ध्येय अशक्य नाही. प्रत्येक सदस्याचा सहभाग प्रत्येक कल्पना आणि प्रत्येक सेवा कार्य आपल्या क्लबला सक्षम आणि समाजासाठी अधिक उपयुक्त बनवेल असे सांगितले आपण सर्वजण मिळून we serve या आपल्या  ब्रीद वाक्याला खऱ्या अर्थाने जगूया आपल्या सेवेतून एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले एखाद्याला नवी आशा मिळाली तर त्यापेक्षा मोठे यश दुसरे कोणतेही नाही सर्वांच्या सहकार्याने हे वर्ष नक्की यशस्वी संस्मरणीय आणि समाजोपयोगी ठरेल असा मला विश्वास आहे. प्रास्ताविकात माजी अध्यक्ष श्री कर्पे यांनी मागील वर्षात राबवलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली जीवन बांदेकर यांनी खर्चाचा तपशील सविस्तर दिला लायन्स पदाधिकारी सीए सागर तेली यांनी गतवर्षी राबवलेल्या विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा शैक्षणिक सामाजिक विषयाची सविस्तर माहिती दिली यावेळी लायन्स क्लब सभासदांच्या मुलांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला यामध्ये मंजिरी  प्रभू, अथर्व  बोर्डवेकर ,स्वरा  कुळकर्णी, हार्दिक घुर्ये सान्वी कुळकर्णी,अथर्व सामंत, शर्वरी प्रभू प्रथमेश कोरगावकर स्वरांगी पाटील या गुणवंतांचा समावेश होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीए जयंती कुळकर्णी  यांनी केले आभार मंजुनाथ फडके यांनी मानले कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम राष्ट्रगीताने कु स्वरांगी पाटील हिने  केली तर सांगता जन गण मन…राष्ट्रगीताने करण्यात आली

लायन्स क्लब ऑफ कुडाळची 2026-27 ची कार्यकारणी 

    अध्यक्ष सौ स्नेहा नाईक 

आय.पी.पी. (माजी अध्यक्ष) आनंद कर्पे,प्रथम उपाध्यक्ष अँड समीर कुळकर्णी ,द्वितीय उपाध्यक्ष जीवन बांदेकर ,तृतीय उपाध्यक्ष मंदार शिरसाट ,सचिव स्नेहांकिता उर्फ शोभा माने, सह-सचिव सीए शैलेश मुडये ,कोषाध्यक्ष अस्मिता बांदेकर सह-कोषाध्यक्ष चैतन्य तेर्से टेमर,गणेश म्हाडदळकर  टेल ट्विस्टर मंजुनाथ फडके ,पीआरओ मिलिंद बांदिवडेकर, जीएसटी डॉ सुशांता कुळकर्णी, जीएमटी अँड मिहिर भणगे, जीएलटी सीए जयंती कुलकर्णी , क्लब मार्केटिंग चेअरपर्सन आनंद बांदिवडेकर, एलसीआय एफ चेअरपर्सन सुनेत्रा  फाटक, संचालक सीए केशव फाटक,जी दत्ताराम ,अँड अजित भणगे, सीए सुनील सौदागर, हेमंत कुडाळकर, मनोहर कामत, अँड अमोल सामंत, डॉ अमोघ चुबे, आर्किटेक मंदार परुळेकर ,अँड श्रीनिवास नाईक ,अनंत शिंदे, नयन भणगे या सर्वांना पदग्रहण अधिकारी श्री पाटील यांनी शपथ दिली

 

फोटो 

लायन्स क्लब ऑफ कुडाळ पदग्रहण सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाची धुरा सौ स्नेहा नाईक यांनी स्वीकारली

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!