Thursday, August 13, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळगुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

कुडाळ | प्रतिनिधी 

 

वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय गुरुवर्य कै. श्री शशिकांत अणावकर सर विद्यानगरी, पणदूरतिठा येथे गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर जयंती दिनानिमित्त ११ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय शालेय समूहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना संस्था सचिव नागेंद्र परब म्हणाले की, शशिकांत आणावकर सर यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे योगदान दिले त्या योगदानाचे मोजमाप कुठेही करता येणार नाही आणि म्हणूनच त्यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांनी केलेल्या कार्याची आठवण म्हणून, त्यांनी केलेले मार्गदर्शन सदैव प्रेरणादायी राहावे व पुढील दिशा निश्चित करण्यासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

         अध्यक्षीय भाषण करताना संस्था अध्यक्ष आपा गावडे यांनी सरांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. १९६० ते आतापर्यंत त्यांच्या सहवासात दिवस कसे गेले, त्यांच्याकडून आपण काय शिकलो, संस्था अध्यक्ष ही त्यांनी दिलेली जबाबदारी पार पडत असताना त्यांनी केलेले मार्गदर्शन कसे उपयोगी पडत आहे, सर आज आमच्यात शरीराने नाही परंतु, मनाने सदैव ते आमच्यात आहेत, त्यांना आम्हाला कधीही विसरता येणार नाही हे अभिमानाने सांगितले. त्याचबरोबर संस्थेच्या यशस्वी वाटचाली शबद्दल माहिती दिली व स्पर्धक संघांना शुभेच्छा दिल्या.

    यावेळी लहान गट- इ. ५ वी ते ८ वी- ६ संघ, इ. ९ वी ते १२ वी मोठा गट- ६ संघ अशी एकूण १२ समरगीते सादर करण्यात आली व प्रत्येक गटातून ३ विजेते संघ व उत्तेजनार्थ ३ संघ निवडण्यात आले.

     या जिल्हास्तरीय समूहगीत स्पर्धेमध्ये लहान गट प्रथम क्रमांक- विद्यामंदिर हायस्कूल कणकवली, द्वितीय क्रमांक- नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय नेमळे व तृतीय क्रमांक- वामनराव महाडिक विद्यालय तळेरे व उत्तेजनार्थ मोठा गट प्रथम क्रमांक- नॅशनल इंग्लिश स्कूल नडगिवे, द्वितीय क्रमांक- वामनराव महाडिक विद्यालय तळेरे व तृतीय क्रमांक- श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यामंदिर माणगाव व उत्तेजनार्थ असे विजेते घोषित करण्यात आले.

            या कार्यक्रमाला संस्था अध्यक्ष आपा गावडे , उपाध्यक्ष प्रकाश जैतापकर, सचिव नागेंद्र परब, सहसचिव जयभारत पालव, खजिनदार सुधाकर वळंजू, संचालक रविंद्र कांदळकर, एम. एस. पाटील सर, प्रशालेचे मुख्याध्यापक एम. जी. कर्पे, पर्यवेक्षिका दाभोलकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते त्याचप्रमाणे जिल्ह्यातील एकूण १२ शाळांचे संघ उपस्थित होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मान. अनिल आचरेकर, डॉ. निशा धुरी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश वालावलकर यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!