Friday, August 14, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीकुडाळातून ग्रामीण महाराष्ट्राच्या औद्योगिक क्रांतीचा श्रीगणेश; "गावं तेथे उद्योजक" अभियानाचा आज शुभारंभ

कुडाळातून ग्रामीण महाराष्ट्राच्या औद्योगिक क्रांतीचा श्रीगणेश; “गावं तेथे उद्योजक” अभियानाचा आज शुभारंभ

कुडाळातून ग्रामीण महाराष्ट्राच्या औद्योगिक क्रांतीचा श्रीगणेश; “गावं तेथे उद्योजक” अभियानाचा आज शुभारंभ

 

​कुडाळ | प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या वतीने “गावं तेथे उद्योजक” या अभियानाची मुहूर्तमेढ सिंधुदुर्गातील कुडाळ येथून रोवली जात आहे. अध्यक्ष रवींद्र माणगावे यांच्या संकल्पनेतील या उपक्रमांतर्गत ‘हॉटेल आराध्या’, झाराप झिरो पॉईंट (मुंबई-गोवा महामार्ग, कुडाळ) येथे महाराष्ट्र चेंबरच्या कोकण विभागीय कार्यालय व नवउद्योजक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता थाटात पार पडणार आहे.

​या सोहळ्याचे उद्घाटक पालकमंत्री – सिंधुदुर्ग तथा मत्स्य व बंदर विकास कॅबिनेट मंत्री ना.नितेश राणे

हे असून, प्रमुख अतिथी म्हणून चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे उपस्थित राहणार आहेत.

​याप्रसंगी आ. दीपक केसरकर,आमदार निलेश राणे,विधानपरिषद आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आणि जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

​ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी देऊन स्वावलंबी बनवणे आणि स्थलांतर थांबवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानाचे कोकण विभाग उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे, MIDC इंडस्ट्रीज असोसिएशन अध्यक्ष श्री. मोहन होडावडेकर, तसेच गव्हर्निंग कौन्सिल सदस्य राजन नाईक, श्री. मनोज वालावलकर, विजय केनवडेकर, अ‍ॅड. नकुल पार्सेकर, श्री. विशाल कामत, कुणाल वरसकर आणि मिलिंद प्रभु यांच्या विशेष प्रयत्नातून हे केंद्र साकारले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!