मालवण येथील राडा प्रकरणी कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू

0

भाजप व उबाठा शिवसेनेचे कार्यकर्ते झाले भूमिगत

या प्रकरणात अजून कार्यकर्त्यांची नावे येण्याची शक्यता

मालवण | प्रतिनिधी

राजकोट किल्ल्यावर उबाठा शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते यांच्यामध्ये राडा झाला याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या कार्यकर्त्यांची धरपकड करायला पोलिसांनी सुरुवात केली असून काही कार्यकर्ते भूमिगत झाले आहेत. याप्रकरणी अजून काही कार्यकर्त्यांची नावे आरोपीत म्हणून वाढण्याची शक्यता वाढली आहे.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला या घटनेची पाहणी करण्यासाठी खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आले होते. त्यांनी पाहणी करून झाल्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी उबाठा शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे व आमदार वैभव नाईक हे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आले आणि त्यावेळी घोषणाबाजी झाल्यानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले आणि राडा झाला याप्रकरणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात मालवण पोलीस ठाण्यात ४२ जणांसह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आता या गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना शोधण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली असून धरपकड सुरू केली आहे. यामध्ये काही कार्यकर्ते भूमिगत झाले आहेत. या कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच ४२ आरोपी यांच्या व्यतिरिक्त अजून काही कार्यकर्त्यांची नावे आरोपी म्हणून घेतली जात आहेत. त्यामुळे या राड्याप्रकरणी आरोपी यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.