Sunday, September 6, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडी१४ ते २५ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात लेझर लाईट व बीम्स उपकरणांच्या वापरास...

१४ ते २५ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात लेझर लाईट व बीम्स उपकरणांच्या वापरास मनाई

सिंधुदुर्गनगरी, दि. ५ सप्टेंबर 

गणेशोत्सवाच्या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात लेझर लाईटचा वापर करण्यात येण्याची शक्यता असते. लेझर लाईट डोळ्यांवर पडल्याने वृद्ध व्यक्ती, लहान मुले तसेच किशोरवयीन व्यक्तींच्या डोळ्यांना इजा होऊन दृष्टीदोष निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये जिल्ह्यात लेझर लाईट/बीम्स उपकरणांच्या सार्वजनिक वापरास दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी ००.०१ वाजल्यापासून ते २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ पर्यंत कोणत्याही व्यक्तीस लेझर लाईट/बीम उपकरणे सार्वजनिक वापरण्यास मनाई आदेश जारी केला आहे. 

गणेशोत्सव हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशमूर्ती आगमन, घरगुती गणेशमूर्ती विसर्जन, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका तसेच अन्य कार्यक्रमांदरम्यान लेझर लाईट डोळ्यांवर पडल्यामुळे वृद्ध व्यक्ती, लहान मुले व किशोरवयीन व्यक्तींच्या डोळ्यांना इजा होऊन दृष्टीदोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा उपकरणांचा अनियंत्रित वापर टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

या कालावधीत काही अपरिहार्य कारणासाठी लेझर लाईट/बीम्स उपकरणांचा वापर करणेचा असल्यास पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ तसेच इतर लागू असलेल्या कायद्यांनुसार शिक्षेस पात्र कारवाई करण्यात येणार आहे. 

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!