कुडाळ नगर पथविक्रेता सदस्य समिती निवडणूक
७ पैकी ६ जागांवर भाजपची बाजी
कुडाळ | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या झालेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या नगर पथविक्रेता सदस्य समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली असून ७ पैकी ६ जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीला भाजपने धुळ चारली आहे.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पथविक्रेता धोरणाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली नगर पथविक्रेता सदस्य समिती निवडणूक ही कुडाळ नगरपंचायत येथे घेण्यात आली या निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. या सदस्य समितीमध्ये पथक विक्रेता व्यवसायिकांमधून ८ सदस्य निवडून देणे गरजेचे होते या ८ सदस्या पैकी भाजपचे ६ उमेदवार निवडून आले त्यामध्ये ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले त्यापैकी भाजपचे सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आरती राऊळ, अनुसूचित जाती प्रवर्गातून नंदकिशोर कुडाळकर, अनुसूचित जमाती प्रवर्गातून रघुवीर आटक, दिव्यांग प्रवर्गातून सरीता ठुंबरे तर महाविकास आघाडीच्या अल्पसंख्यांक प्रवर्गातून जुबेदा शेख हे बिनविरोध झाले तर सर्व साधारण प्रवर्गाच्या २ जागांसाठी ३ उमेदवार रिंगणात होते यासाठी आज मंगळवार ३ सप्टेंबर रोजी निवडणूक झाली.
कुडाळ नगरपंचायत येथे ही निवडणूक पार पडली सकाळी ११ वा. निवडणुकीला सुरुवात झाली सायं. ५ वा. निवडणूक संपली. यामध्ये २४३ पथविक्रेता मतदारांपैकी ११६ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला त्यामध्ये १० मते बाद झाली १०६ मतांमध्ये अजित गाड यांना ७९ मते, प्रशांत वायंगणकर यांना ७० मते, नाझमिन करोल यांना ४३ मते मिळाली यामध्ये भाजपचे अजित गाड व प्रशांत वायंगणकर हे निवडून आले. या निवडणुकीमधील इतर मागास महिला प्रवर्ग यासाठी कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता त्यामुळे या प्रवर्गाचे पद रिक्त राहिले ही निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुधीर मरगळ रजीज पठाण निलेश महाडेश्वर श्री मयेकर श्री साळगावकर शैलेश नेवाळकर रोहित परब यांनी काम पाहिले विजेत्या उमेदवारांना मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले.
भाजपने मारली बाजी
कुडाळ नगरपंचायतीच्या नगर पथविक्रेता सदस्य समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली यामध्ये झालेल्या ७ जागांच्या निवडणुकीपैकी ६ जागांवर भाजपने बाजी मारली या ६ जागांपैकी ४ जागा बिनविरोध भाजपने जिंकल्या होत्या आणि २ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा दोन्ही जागांवर विजय मिळवला या विजय झालेल्या उमेदवारांचे मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, जिल्हा सरचिटणीस विनायक राणे यांनी पुष्पहार घालून अभिनंदन केले. तसेच फटाक्यांची आताच बाजी करून विजय साजरा केला. यावेळी भाजपचे गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक निलेश परब, राजीव कुडाळकर, नगरसेविका चांदणी कांबळी, नगरसेवक गणेश भोगटे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष मुक्ती परब, श्रीपाद तवटे , सुनील बांदेकर, बाळा पावसकर, प्रसन्ना गंगावणे, राकेश नेमळेकर, नागेश नेमळेकर, विश्वास पांगुळ आदी उपस्थित होते. यावेळी भाजपा गटनेता विलास कुडाळकर यांनी सांगितले की, ही निवडणुकी माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली लढविण्यात आली यासाठी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, माजी नगराध्यक्ष विनायक राणे यांचे मार्गदर्शन लाभले या निवडणुकीमध्ये भाजपचे सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहकार्य केले या सर्वांचे आभारही मानत असल्याचे म्हटले आहे.
