अधीक्षक अभियंता, महावितरण यांची आज जिल्हा परिषद सदस्य मा. रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वात कवठी ग्रामस्थांनी भेट घेतली.
स्मार्ट मीटर व वाढीव वीज बिला संदर्भात ग्रामस्थांच्या तक्रारी मांडून सविस्तर चर्चा करण्यात आली
जनतेच्या हितासाठी आम्ही कायम लढणार असल्याचे रुपेश पावसकर यांनी सांगितले आणि ग्रामस्थांच्या शंकेचे निरसन झाल्याशिवाय स्मार्ट वीज मीटर बसवू नयेत अशी सूचना अधिक्षक अभियंता यांना केली ती त्यांनी मान्य करत संबंधित कर्मचारी यांना तशा सूचना दिल्या
यावेळी मंगेश बांदेकर, रुपेश वाडयेकर, राजन खोबरेकर, नंदकिशोर वाडयेकर, सुहास खोबरेकर ,गोकुळ तोरस्कर आदी कवठी ग्रामस्थ उपस्थित होते


