सिंधुदुर्ग राजाची विसर्जन मिरवणूक उद्या सोमवार २३ सप्टेंबर रोजी निघणार

0

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे विराजमान झालेल्या सिंधुदुर्ग राजाची विसर्जन मिरवणूक उद्या सोमवार २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वा. निघणार आहे तसेच सिंधुदुर्ग राजाच्या दरबारामध्ये दुपारी १२ वा. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या विसर्जन मिरवणुकीमध्ये भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे सहभागी होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.

कुडाळ येथे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग राजा सार्वजनिक गणेश उत्सवाची स्थापना करण्यात आली या गणेश उत्सवानिमित्त यावर्षी सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना १७ दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक, वैद्यकीय कार्यक्रमाने पार पडली. सिंधुदुर्ग राजाचे विसर्जन उद्या सोमवार २३ सप्टेंबर रोजी पावशी तलाव येथे होणार आहे या निमित्ताने दुपारी १२ वा. महाप्रसाद असणार असून दुपारी ३ वा. सिंधुदुर्ग राजाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे तरी गणेश सर्व गणेश भक्तांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.