कुडाळ | प्रतिनिधी
आंबेडकरी चळवळीतील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय संविधानिक हितकार्यकारीणी महासंघाच्या अध्यक्षपदी महेश परुळेकर यांची निवड करण्यात आली. सर्व राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी एकत्र येऊन स्थापन केलेली ही जिल्ह्यातील पहिली सामाजिक चळवळ असल्याचे आरपीआयचे राज्य सहसचिव रमाकांत जाधव यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते विविध राजकीय पक्षांमध्ये पदे भूषवीत आहेत. या सर्वांना एकत्र करून सामाजिक चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी नवा विचार निर्माण झाला आणि यामधून संविधानिक हितकारिणी महासंघाची निर्मिती झाली ही निर्मिती झाल्यानंतर या महासंघाचे स्वरूप ठरवण्यासाठी कुडाळ येथील एमआयडीसी विश्रामगृह येथे नुकतीच सभा आरपीआय (आठवले गट) राज्य सहसचिव रमाकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. यावेळी बसपाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हाध्यक्ष पी. के. चौकेकर, समाजभूषण पुरस्कार प्राप्त व बौद्ध महासभेचे नेते प्रभाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या सभेला वंचित बहुजन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, माजी नगरसेवक गौतम खुडकर, नगरसेवक विलास कुडाळकर, एड. एस. के. चेंदवणकर, विजय कदम, पत्रकार शंकर जाधव, आनंद देवगडकर, दिलीप वाडेकर, विश्वनाथ पडेलकर, जयंत जाधव, सखाराम जाधव, माजी नगरसेवक वामन कांबळे, दुलाजी चौकेकर, एड. नामदेव मठकर, ऍड. एस. व्ही. कांबळे, वासुदेव जाधव, संदेश कदम, सचिन जाधव, बाळा जाधव, विष्णू तेंडोलकर, विनोद कदम, सत्यवान तेंडोलकर, मंगेश गावकर, देवदत्त कदम, के. एस. कदम, संदीप जाधव, चंद्रकांत वालावलकर, आनंद धामापूरकर, केशव जाधव, सुधीर अणावकर, चंद्रकांत म्हापणकर, सरपंच सुशील कदम, सुशील जाधव, तुषार जाधव आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व निमंत्रण उपस्थित होते.
या महासंघाच्या जिल्हा कार्यकारणीची स्थापना करण्यात आली यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष विजय कदम, एड. एस. के. चेंदवणकर, विश्वनाथ पडेलकर, के. एस. कदम, वासुदेव जाधव, चंद्रकांत म्हापणकर, सुशील कदम, शंकर जाधव, जिल्हा सचिव पदी संदीप जाधव, बाळा जाधव, सत्यवान तेंडोलकर, विलास कुडाळकर, दिलीप वाडेकर, आनंद देवगडकर, जिल्हा कोषाध्यक्षपदी अर्जुन आयनोडकर, सहकोषाध्यक्ष देवदत्त कदम, कायदेशीर सल्लागार एड. नामदेव मठकर, एड. एस. व्ही. कांबळे, सदस्य महासंघाचे सर्व निमंत्रक अशी ही निवड करण्यात आली.
या सभेमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली सामाजिक हितासाठी अशा प्रकारच्या महासंघाची निर्मिती करण्याची ऐतिहासिक घटना आहे असे सभाध्यक्ष रमाकांत जाधव यांनी सांगून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निळ्या झेंड्याखाली एकत्र येऊन हे काम करणे अपेक्षित आहे. समाजातील हे प्रश्न सोडवण्यासाठी विविध राजकीय पक्षांमध्ये काम करणारे कार्यकर्ते एकत्र येऊन प्रयत्न केले तर ते नक्की सुटतील. सर्वच प्रश्न संघर्षाने सुटत नाही तर काही प्रश्न सोडण्यासाठी सुसंवाद साधावा लागतो आणि हा संवाद साधण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. पुढील काळामध्ये समाजातील विविध प्रश्न घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्याजवळ महासंघ जाणार आहे. त्यांना आमच्या समाजाच्या प्रश्नांसाठी जनता दरबार आयोजित करण्याची विनंती करणार आहे असे रमाकांत जाधव यांनी सांगितले. यामधून आपल्याला समाज जोडायचा आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


