Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळ*परळ-निरुखे एसटी बसचे 38 व्या वर्षात पदार्पण*

*परळ-निरुखे एसटी बसचे 38 व्या वर्षात पदार्पण*

मौजे निरूखे ता. कुडाळ, जि.सिंधुदुर्ग येथील जादा विशेष परळ-निरूखे एसटी बसने यावर्षी ३८ वर्षात पदार्पण केले. 

कोकणातील गणेशोत्सव आणि चाकरमानी यांचे नाते अतुट व भावणीक आहे. कोकण रेल्वे येण्यापुर्वी चाकरमानी मंडळी एसटी बसने कुटुंबासह घरच्या ओढीने गणपती ऊत्सवासाठी गावी जायचे आणि यायचे. कोकण रेल्वे चालू झाल्यामुळे ईतर गावातील विशेष जादा एसटी बसेस बंद झाल्या. परंतु निरूखे गावातील मुंबईकर चाकरमानी यांची ज्यादा एसटी बस परळ-निरूखे आणि चाकरमानी यांची युती मात्र गेली अडतीस वर्ष अभेद्य राहिली. याला एकच कारण चाकरमाण्यांचा एकोपा आणि एसटी बसचे प्रेम. यावर्षी ही एसटी बस 38व्या वर्षात पदार्पण करीत आहे. अतिशय आकर्षक पद्धतीने बसची फुलांनी सजावट करण्यात आली. 

दि. २४/०८/२०२५ रोजी संद्याकाळी ४:३० वाजता स्वामी नारायण मंदिर दादर (पूर्व) येथे निरूखे ग्रामस्थ संघांचे जेष्ठ सल्लगार *श्री. प्रकाश कदम* यांच्या हस्ते गाडीला हार-फुले घालून श्रीफळ व पेढे ठेऊन गाडीची पूजा केली तसेच देवाला गाराणे करून श्रीफळ वाढविले. त्यानंतर गणेशभक्त प्रवाशांना लाडू, पेढे, चहा व पाणी देण्यात आले.

त्यानंतर बस नटून थटून दिमाखात डौलाणे भगवा ध्वज फडकवत गावाकडे जाण्यासाठी रवाना झाली. त्यानंतर दुसरा दिवशी सकाळी ६ वाजता गावी पोहचल्यावर निरूखे ग्रामस्थ संघांचे अध्यक्ष *श्री अरुण पवार* आणि गावातील मंडळी यांनी प्रवाशांचे स्वागत केले सर्व प्रवाशांना चहा व लाडू देण्यात आले. सर्व प्रवाशी आनंदाने आप आपल्या घरी जाण्यास निघाले. याचे आतापर्यंतचे सर्व श्रेय निरूखे गावचे सुपुत्र व मुबईतील चाकरमानी *श्री. दीपक सरनोबत* यांना जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!