कुडाळ | प्रतिनिधी
सोनवडे तर्फ हवेली मठवाडी येथे महसूल विभागाने छापा टाकून शासनाच्या परवानगीशिवाय वाळूचे बेकायदेशीर ते उत्खनन करून तिची चोरी करून अवैद्य वाळू साठा केला प्रकरणी बाबाजी सखाराम मांजरेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कुडाळ महसूल विभागाने अवैध वाळू उत्खनन, वाहतूक व साठा केल्या प्रकरणी छापे घालायला सुरुवात केले आहे सोनवडे तर्फ हवेली येथे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून या ठिकाणी शासनाच्या परवानगीशिवाय वाळू उत्खनन करून त्याची चोरी करून साठा करणाऱ्या बाबाजी मांजरेकर यांना पकडले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई भरारी पथक व पोलीस यांनी मिळून केली आहे. याबाबत पुरा पोलीस ठाण्यात मंडळ अधिकारी प्रशांत मसुरकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.


