Sunday, June 21, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीहॉस्पिटलच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून लवकरच सुसज्ज असे हॉस्पिटल वेंगुर्लेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करणार...

हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून लवकरच सुसज्ज असे हॉस्पिटल वेंगुर्लेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करणार हा पालकमंत्री नितेश राणे

वेंगुर्ला | प्रतिनिधी 

शिरोडा येथील ताज हॉटेलसाठी लागणारी पर्यावरण विभागाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच ताज हॉटेल उभे राहून येथील तरूण तरूणींना रोजगार मिळणार आहे. तर गेल्या तीन दिवसांत केलेल्या पाठपुराव्यानंतर सेंट लुक्स हॉस्पिटलबाबत त्याची फायनल ऑर्डर आणण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून लवकरच सुसज्ज असे हॉस्पिटल वेंगुर्लेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करणार असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी आज वेंगुर्ला येथील पत्रकार परिषदेमध्ये दिली.

    भाजपाचे उमेदवार आणि मतदारांशी चर्चा करण्यासाठी पालकमंत्री वेंगुर्ला येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप गिरप, प्रदेश सदस्य राजू राऊळ, तालुकाध्यक्ष पपू परब यांच्यासहित पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्रातील चारही नगरपरिषदेंच्या निवडणुका भाजप पक्ष फक्त विकासाच्या अजेंड¬ावर लढवित असल्याची भूमिका भाजपच्या सर्व नेत्यांनी मांडलेली आहे. कोणत्याही पद्धतीचे गलिच्छ राजकारण, आपापसातील टिका टिपण्णीमध्ये आम्हाला रस नाही. या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही वेंगुल्र्याच्या जनतेसाठी काय करू शकतो? कुठला विकास करू शकतो हा आमचा हेतू आहे.

     शिरोड¬ातील पंचतारांकित ताज हॉटेलबाबत गेले काही वर्षे चर्चा होती. यासाठी अनेक पाठपुरावा झाला. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या ताज हॉटेलसाठी लागणारी पर्यावरण विभागाची परवानगी मिळाली असल्याने सिंधुदुर्गातील पहिल्या पंचतारांकित हॉटेलचा मार्ग मोकळा झाला आहे. या हॉटेलसोबतच तेथील प्रलंबित प्रश्नांनासाठी जनतेला वि·ाासात घेतले जाणार आहे. ताज प्रकल्पाशी निगडीत उपलब्ध होणा-या नोक-या प्राधान्याने वेंगुर्लावासीयांना देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी लागणारे प्रशिक्षण आम्ही देणार आहोत. ताज हॉटेल पर्यटनाची गती अधिक वाढवेल. जिल्ह्रात आर्थिक समृद्धी येण्यासाठी हे हॉटेल अतिशय महत्त्वाचे ठरेल असा वि·ाास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

वेंगुर्ला शहरातील सेंटलुक्स हॉस्पिटल हा नेहमीच चर्चेचा विषय राहीला आहे. भाजपाच्या पदाधिका-यांनी हा विषय हातात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी एका टप्प्यावर हा विषय आणून ठेवला आहे. गेल्या तीन दिवसांत केलेल्या पाठपुराव्यानंतर त्याची फायनल ऑर्डर आणण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. यापुढे सेंटलुक्सच्या व्यवस्थापनाशी आम्ही बोलू आणि लवकरच वेंगुल्र्यात सुसज्ज असे हॉस्पिटल वेंगुर्लेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. चांगले डॉक्टर, चांगली मेडिकल सुविधा या सगळ्यांसाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. याचबरोबर उपजिल्हा रूग्णालयात असलेल्या अपु-या सुविधांवर सुद्धा आम्ही काम करून त्याठिकाणी चांगले डॉक्टर, चांगल्या सुविधा देणार आहोत. आरोग्याच्या विषयामध्ये वेंगुर्लेकरांना कोणावरही अवलंबून न रहाता आदर्श आरोग्य सुविधा उपलब्ध देण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही ठोस पावले उचलली आहेत.

    पाणबुडी प्रकल्प सर्व परवानग्यांच्या प्रक्रियेत आहे. या प्रकल्पाबाबत ज्या पद्धतीने आमदार दीपक केसरकर यांनी उल्लेख केला तसा लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल. आम्ही सर्वजण सरकारमध्ये याचा पाठपुरावा करीत असल्याचेही पालकमंत्री म्हणाले. गिरप यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज नुतनीकरण, कलादालन, दीपगृहाकडे जाणा-या पाय-यांचे सुशोभिकरण, कचरा डेपोचे स्वच्छ भारत पर्यटन स्थळात रूपांतर अशी असंख्य कामे यापूर्वी आम्ही करून दाखविलेली आहे. पुन्हा एकदा गिरप नगराध्यक्ष म्हणून बसतील, सर्व नगरसेवकांची टीम बसेल त्यावेळी सत्तेच्या माध्यमातून वेंगुल्र्याचा विकास करण्यासाठी सज्ज आहोत. यासाठी २ डिसेंबरला आम्हाला मतदारांनी आशीर्वाद द्यावा असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

 

झी सिने अॅवॉर्ड वेंगुर्ल्यात 

 

झी सिनेमेसारखे अॅवॉर्ड वेंगुल्र्यामध्ये पुढीलकाळात होणार आहे. यामुळे कोकणासहीत वेंगुल्र्याची सुद्धा चर्चा होणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्राचे अर्थकारण बदलून जाणार आहे. म्हणून या निवडणुका आम्ही “आरेला कारे’ करण्यासाठी किंवा राजकारण म्हणून नाही तर सत्तेच्या माध्यमातून काय करू शकतो, काय परिवर्तन आणू शकतो या दृष्टीकोनातून प्रयत्न करणार आहोत असेही त्यांनी सांगितले.  

 

चौकट: ठाकरे सेनेला मतदान करणा-या पारंपरिक मतदारांना कणकवलीमध्ये होणारी शहरविकास आघाडी ही मान्य आहे काय? मग एकाच जिल्ह्रामध्ये तुम्ही दोन भूमिका कशा घेऊ शकतात. एका तालुक्यामध्ये तुम्ही युती करता आणि दुस-या तालुक्यात विरोधांत लढतात. मग मतदारांनी नेमका काय विचार करायचा? नेमके तुम्ही शिंदेसेनेच्या विरोधात आहात की, त्यांच्या बाजूने आहात.? उद्धव ठाकरेंेच मुख्यमंत्री पद घालवाणारे एकनाथ शिंदे आहेत असे आरोप आदित्य ठाकरे आजपर्यंत करत होते. एकाबाजूने त्यांना गद्दार म्हणायचे व दुस-या बाजूने त्यांच्यासोबत जायचे. असे समीकरण असेल तर मतदारांनी त्याबाबत विचार करायला हवा. ही मतदारांशी फसवणूक असल्याचेही पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.

 

फोटोओळी — वेंगुर्ले येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री नितेश राणे सोबत मनिष दळवी, राजू राऊळ, पपु परब व इतर.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!