Sunday, June 21, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडी*नव्या दमाचे नेतृत्व, जुन्या संस्कृतीचा सन्मान!*

*नव्या दमाचे नेतृत्व, जुन्या संस्कृतीचा सन्मान!*

ओटवणे गाव चव्हाटा महोत्सवाला भाजप युवा नेते महाराष्ट्र राज्य विशालजी परब आणि ॲड. अनिल निवर्डेकर यांची भेट; १२ व्या वर्षाचा सोहळा दिमाखात संपन्न!

 

 ‘गावठाणवाडी कला क्रीडा व मित्रमंडळ’ यांच्या वतीने आयोजित गाव चव्हाटा महोत्सवाचे १२ वे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे झाले. या उत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्री. विशालजी परब यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले.

प्रमुख पाहुणे विशालजी परब यांचे आगमन होताच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. आपल्या मार्गदर्शनात विशालजी परब यांनी ग्रामीण भागातील कला आणि क्रीडा गुणांना वाव देणाऱ्या अशा महोत्सवांचे महत्त्व अधोरेखित केले. गावातील एकजूट आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी गावठाणवाडी मंडळाने गेल्या १२ वर्षांपासून सुरू ठेवलेले हे सातत्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ओटवणे गावचे सरपंच दाजी गावकर, ग्रामपंचायत सदस्य महेश चव्हाण, ॲड. अनिल निवर्डेकर, युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, आणि मंडळाचे अध्यक्ष उमेष गावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुरान, बाळा गावकर, अमोल गावकर, मंगेश चिले यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी बाळा गावकर यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!