Sunday, June 21, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळात जि.प.चे ५ अर्ज बाद; माजी जिल्हा परिषद सदस्या वर्षा कुडाळकरांचे तेंडोली-पिंगुळीतील...

कुडाळात जि.प.चे ५ अर्ज बाद; माजी जिल्हा परिषद सदस्या वर्षा कुडाळकरांचे तेंडोली-पिंगुळीतील दोन्ही अर्ज अवैध.

जि.प.चे ४३ तर पं.स.चे सर्व ६४ अर्ज वैध

 

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या नामनिर्देशन अर्ज छाननी प्रक्रिया आज (गुरुवारी) झाली. या छाननमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्या वर्षा कुडाळकर यांनी दाखल केलेले तेंडोली व पिंगुळी मतदार संघातील दोन्ही अपक्ष उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. तसेच इतर तीन जणाचे मिळून एकूण ५ अर्ज अवैध ठरले.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या. अर्ज छाननी प्रक्रिया कुडाळ तहसीलदार कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी जि.प. च्या प्राप्त ४८ पैकी ४३ उमेदवारी अर्ज वैध तर ५ उमेदवारी अर्ज अवैध ठरले. पं.स.च्या प्राप्त ६४ पैकी सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले. जि.प.व पं.स. मिळून प्राप्त ११२ पैकी १०७ अर्ज वैध ठरले. जि.प. च्या अवैध अर्जात अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य वर्षा कुडाळकर यांचे तेंडोली व पिंगुळी दोन्ही अर्ज अवैध ठरले. पिंगुळी जि.प. मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अंकुश जाधव व अपक्ष कल्पेश मसके आणि पावशी जि. प. मतदारसंघातील अपक्ष रामदास गोपाळ ठाकूर यांचे अर्ज अवैध ठरल्याची माहीती निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी दिली.

छाननी प्रक्रिये दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन पाटील, संजय गवस, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आदी उपस्थित होते. यावेळी सर्व उमेदवार व प्रतिनिधी उपस्थित होते.

महायुतीतील जागा वाटपाचा फॉर्मुला जाहीर झाल्यानंतर नाराज झालेल्या वर्षा कुडाळकर यांनी शिंदे शिवसेनेला सोडचिठ्ठी देत पिंगुळी व तेंडोली जि. प. मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केली होते. मात्र त्यांचे दोन्ही अर्ज बाद ठरले आहेत. यावेळी निवडणूक निरीक्षक इब्राहिम चौधरी यांनी या चांदणी प्रक्रियेला भेट देऊन माहिती घेतली.

फोटो- अर्ज छाननी प्रक्रिया कुडाळ तहसीलदार कार्यालयात पार पाडताना अधिकारी व कर्मचारी.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!