कुडाळ,28जाने
आमचे नेते अजितदादा पवार यांचे अकाली जाणे आम्हाला चटका लावून गेले अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस ज्येष्ठ नेते सावळाराम अणावकर यांनी श्रद्धांजली वाहिली. अणावकर यांनी सांगितले, चांदा ते बांदा नवे देशाच्या पूर्व पश्चिम राजकारण आणि समाजकारण क्षितिजात शुक्रताऱ्या प्रमाणे लोकशाही दिशा दर्शवणारी एकच लोकाभिमुख नेता शत्रु मित्र परिवारात घर करून वावरणारे बारामतीच्या पवार कुटुंबीयातील अजित दादा यांचे अकाली जाणे आम्हाला धक्कादायकच आहे बारामती मध्ये विमान लँडिंग वर येता स्पोट होतो ही गोष्टच वेदनादायी आहे छत्रपती शिवाजी महाराज फुले आंबेडकर शाहू महाराज यांच्या पुरोगामीत्वावर विश्वास असणाऱ्यानी दादांची प्राणजोत मालवावी ही चटका देणारी स्थिती आहे अपघाताची पार्श्वभूमी शोधून काढली जावी कारण उच्चपदस्थ नेतृत्व ज्या वाहनाने प्रवास करतात त्याची काय स्थिती होती हा प्रश्न सातत्याने भेडसावणारा आहे बारामतीच्या पवार कुटुंबीयांनी राजकारणी समाजकारणाची नाळ संपलेली नाही कृषी उद्योग शिक्षण या क्षेत्रात फार मोठे योगदान गेली साठ वर्षे देताना दिसते राज्यकर्ते कोण यापेक्षा तळागाळातील जनतेच्या दादांच्या अपघाती निधना बाबत वास्तव जनतेला समजले पाहिजे आज राजकारणात वर्तनाचे अनेक कंगोरे दृष्टी पती येतात ही बाब चिंताग्रस्त करणारी असल्याची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सावराम अणावकर यांनी व्यक्त केली


