Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळशिवसेना पक्षातून रत्नाकर जोशी यांचे निलंबन - शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची...

शिवसेना पक्षातून रत्नाकर जोशी यांचे निलंबन – शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती 

महायुतीच्या मोठया विजयाचा व्यक्त केला विश्वास

 

कुडाळ | प्रतिनिधी 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती एकसंघपणे चांगल्या प्रतिसादात प्रचारयंत्रणा राबवत आहे. महायुतीचे सर्व उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी होतील. महायुतीच्या अधिकृत उमेदवार विरोधात उमेदवारी दाखल केलेल्यांचे पक्षातून निलंबन करण्यात येत आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव पंचायत समिती मध्ये महायुतीच्या अधिकृत उमेदवार विरोधात रत्नाकर जोशी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे रत्नाकर जोशी यांचे शिवसेना पक्षातून सहा वर्षा साठी निलंबन करण्यात आले आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!