दुचाकीसाठी 350 चा घाव; कष्टकऱ्यांवर टोलचा बोजा, आंदोलनाचा इशारा…
*सिंधुदुर्ग*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचा आणि संघटनांचा तीव्र विरोध डावलून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने अखेर ओसरगाव टोलनाका दि. 17 ऑगस्ट 2026 पासून सुरू करण्याचा आदेश काढला आहे. यामुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
NHAI कोल्हापूर कार्यालयाने जाहीर सूचना प्रसिद्ध करत NH-66 वरील टोलवसुलीला हिरवा कंदील दिला आहे. यामध्ये सर्वात मोठा घाव कष्टकरी, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या दुचाकीवर पडला आहे.
*दुचाकीला 350 चा दणका*
सूचनेनुसार *”स्थानिक अवजडजक्य प्रकारच्या वाहनांकरिता मासिक पास शुल्क 350 रुपये आकारले जाईल”*. म्हणजेच रोज कामासाठी जाणाऱ्या दुचाकीधारकाला आता वर्षाला 4200 रुपये अतिरिक्त बोजा सहन करावा लागणार आहे.
*टोलचे डरकाळे दर*
– *कार*: एकेरी 125, मासिक 4170
– *हलकी व्यावसायिक*: एकेरी 200, मासिक 6740
– *ट्रक/बस*: एकेरी 425, मासिक 14120
– *3 एक्सल*: एकेरी 460, मासिक 15405
*”जनतेच्या विरोधाला किंमत शून्य?”*
गेली अनेक वर्षे सिंधुदुर्गवासी टोलला विरोध करत आहेत. “रस्ते खड्डेमय, पर्यायी मार्ग नाहीत, तरीही टोल सक्तीचा. आता दुचाकीही सोडली नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.
टोलचा ठेका मे. स्कायलार्क इन्फ्रा इंजिनिअरिंग कंपनीला देण्यात आला आहे.
*आंदोलनाचा इशारा*
स्थानिक नेते, व्यापारी आणि रिक्षा-एसटी चालक संघटनांनी येत्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबतलोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करून दुचाकीधारकांना टोलमधून सूट द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
*कॅप्शन*: _NHAI च्या सूचनेनुसार 17 ऑगस्टपासून ओसरगाव टोल सुरू. दुचाकीसाठी 350 रुपये मासिक पासमुळे जिल्ह्यात संताप.


