Monday, September 7, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीगोव्यात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे राष्ट्रवादी युवा नेते अरशद बेग यांनी...

गोव्यात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे राष्ट्रवादी युवा नेते अरशद बेग यांनी केले स्वागत; सिंधुदुर्गातील पक्षाच्या सद्यस्थितीवर चर्चा

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा. सुनेत्राताई अजितदादा पवार यांचे गोवा डिचोली येथे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अरशद बेग यांनी उत्साहात स्वागत केले.

यावेळी अरशद बेग यांनी सुनेत्राताई पवार यांच्याशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सद्य राजकीय व संघटनात्मक स्थिती याबाबत सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, युवा कार्यकर्त्यांना सक्रिय करणे तसेच आगामी काळात पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर यावेळी विचारविनिमय करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती, पक्षाची आगामी वाटचाल आणि युवा नेतृत्वाची भूमिका यावरही यावेळी चर्चा झाली. पक्षाच्या विचारधारेनुसार तळागाळात संघटन मजबूत करण्यासाठी युवा पदाधिकाऱ्यांनी अधिक जोमाने काम करण्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा पदाधिकारी व सहकारी तौसिफ आगा,मन्सूर ख्वाजा,शहबाज आगा तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सुनेत्राताई पवार यांच्या भेटीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!