Friday, September 11, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीप्राजक्ता वालावलकर यांना राज्यस्तरीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्कार जाहीर

प्राजक्ता वालावलकर यांना राज्यस्तरीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्कार जाहीर

ओरोस : 

जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा बांव, तालुका कुडाळच्या मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता दत्तप्रसाद वालावलकर यांना ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाला आहे..

शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनतर्फे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापक आणि स्वामी विवेकानंद आदर्श शिक्षक हे राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात.

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्रातील विविध तालुक्यांतील प्राप्त प्रस्तावातून संस्थेच्या निवड समितीने प्रस्तावांची छाननी करून केलेल्या शिफारशीनुसार प्राजक्ता वालावलकर यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. लवकरच या पुरस्काराचे वितरण होणार आहे. दरम्यान 

प्राजक्ता वालावलकर यांच्या निवडीबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!