Saturday, September 19, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडी१९८८ च्या माजी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासासाठी कौतुकास्पद संकल्प

१९८८ च्या माजी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासासाठी कौतुकास्पद संकल्प

कलंबिस्त :

कलंबिस्त पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्त येथे १९८८ च्या माजी विद्यार्थ्यांची स्नेहभेट नुकतीच पार पडली. या वेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रशालेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एकत्रितपणे योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

१९८८ च्या बॅचचे माजी विद्यार्थी प्रल्हाद तावडे, उत्तम राऊळ, रमेश कदम, जयवंत गवस, अनंत राऊळ, राजन नेवगी, संतोष धोंड, लक्ष्मण पवार, प्रेमानंद सावंत आणि दिगंबर गोवेकर यांनी प्रशालेस भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला.प्रशाला तसेच संस्थेतर्फे त्यांचे प्रशालेचे लिपिक रविकमल सावंत यांनी स्वागत केले.यावेळी बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना आधुनिक व रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे, यासाठी प्रशालेत नवीन कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सहकार्य करण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शैक्षणिक वसतिगृह उभारण्याच्या उपक्रमास आवश्यक ती मदत करण्याचा निर्धार माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.“ज्या प्रशालेने आपल्या जीवनाला दिशा दिली, त्या प्रशालेच्या भावी पिढीसाठी आपण काहीतरी योगदान द्यावे,” या भावनेतून माजी विद्यार्थ्यांनी घेतलेला हा निर्णय निश्चितच प्रेरणादायी आहे.माजी विद्यार्थ्यांच्या या पुढाकाराचे प्रशालेच्या वतीने स्वागत करण्यात आले. माजी विद्यार्थी आणि प्रशाला यांच्यातील हा ऋणानुबंध भविष्यात शैक्षणिक विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास यावेळी मुख्याध्यापक श्री. अभिजित जाधव यांनी व्यक्त केला..

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!