कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ शहरातील गांधी चौक येथे असलेल्या एका छोट्या दुकानात मिलन मटका बाजार घेत असताना दत्तनगर येथील रुद्रप्रताप रामचंद्र गवस याला कुडाळ पोलिसांनी पकडले त्यांच्याकडून १ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
कुडाळ गांधी चौक जवळ असलेल्या एका छोट्या दुकानात अनधिकृत मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर कुडाळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र भांड, योगेश मांजरेकर यांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता रुद्रप्रताप गवस यांच्याजवळ मिलन मटका बाजाराचे साहित्य तसेच मटका घेत असताना ते सापडून आले त्यांच्याजवळ १ हजार ५७० रुपये पडला मुद्देमाल सापडला याप्रकरणी रुद्रप्रताप गवस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
