आंबडपाल शाळेने घडविला इतिहास ;  राज्यस्तरीय परसबाग स्पर्धेमध्ये राज्यात तिसरा क्रमांक

0

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ तालुक्यातील आंबडपाल येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक या ग्रामीण भागातील प्रशालेने राज्यस्तरीय परसबाग स्पर्धेमध्ये राज्यात तिसरा क्रमांक पटकावून इतिहास घडविला आहे.

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रम सन २०२३ – २०२४ अंतर्गत राज्यस्तरीय उत्कृष्ट परसबाग स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला . परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे यासारखे हेतू या उपक्रमामुळे साध्य झाले प्रत्येक जिल्हयातून एक परसबाग राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी पात्र ठरलेली होती अशा मुंबई शहर सोडून सर्व इतर ३५ जिल्हयातील प्रथम क्रमांकाच्या परसबागेचे परिक्षण होऊन आंबडपाल शाळा राज्यात तिसऱ्या क्रमांकासाठी पात्र ठरली सदर शाळांचा विशेष सन्मान महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आय. ए. कुंदन ( प्रधान सचिव), अर्चना अवस्थी, सहसचिव आर. विमला ( प्रकल्प संचालिका ), आयुक्त सूरज मांढरे, संचालक राहुल रेखावार , योगेश सोनवणे ( आयटी विभाग प्रमुख ) यांच्या उपस्थित २१ हजार धनादेश, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन दिमाखदार सोहळ्यात गौरवण्यात आले या प्रसंगी आंबड्पाल गावचे सरपंच मा . महेश मेस्त्री, कृषी व शिक्षण तज्ज्ञ तानाजी सावंत , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री. सुरेश तानिवडे ,.श्री . महेश नाईक व शाळेचे मुख्याध्यापक श्री . संजय बगळे यांनी सत्कार व बक्षिस स्विकारले. शिक्षण क्षेत्रातील सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होऊन प्राविण्य पटकाविणारी ग्रामीण भागातील शाळा म्हणून आंबडपाल शाळेचा नावलौकिक आहे मागील दोन वर्षात शाळेतील दोन विद्यार्थ्यांची निवड नवोदय विद्यालयासाठी झाली आहे तसेच आधुनिक काळात संगणक व कोडिंग मधील हॅका थॉन स्पर्धेत जिल्हयात एक ते दहा मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावून शाळेसाठी टॅब जिंकला तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय बगळे यांनी शिक्षकांसाठी असलेल्या कोडिंग स्पर्धेत भाग घेऊन टॅब जिंकला नुकत्याच झालेल्या व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये शाळेतील शिक्षिका सौ साक्षी कदम व सौ सुचिता गोसावी यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत ही आंबडपाल शाळेने तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावून दोन लाखाचे बक्षिस जिंकले अशा प्रकारे ग्रामीण भागातील शाळा असूनही कुडाळ तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्याला राज्यस्तरावर गौरव प्राप्त करून देण्यास योगदान दिले यात शाळेतील शिक्षकवृंद विद्यार्थी पालक सर्व समिती सदस्य स्वयंपाकी व मदतनीस ग्रामस्थ मित्रमंडळी व अधिकारी पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्षा सौ साक्षी सावंत व विद्यमान अध्यक्ष विठ्ठल सावंत यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन शाळेला नावलौकिक मिळवून देण्यास योगदान दिले ग्राम देवता भद्रकालीच्या कृपेने शाळेची उत्तरोत्तर अशीच प्रगती होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला .