श्री देवी केळवाई मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ केळबाईवाडी येथील श्री देवी केळवाई मंदिरात श्री देवी केळवाई उत्सव मंडळाच्यावतीने ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे यानिमित्त विविध धार्मिक व साकृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उत्सव कालावधीत रोज सायंकाळी ७ वाजता श्री देवीची आरती, रात्री ८ वाजता संपूर्ण रामायण दर्शन, ९.१५ कीर्तनकार चिंतामणी सामंत बुवा ( भोगवे ) यांचे कीर्तन होणार आहे. ३ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता घटस्थापना ,सायंकाळी ४.३० वाजता आजगावकर दशावतार मंडळ (आजगाव ) यांचे आई तुळजाभवानी नाटक, रात्री ११ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, ४ रोजी सकाळी १० वाजता बाल क्रीडा स्पर्धा, सायंकाळी ४.३० वाजता वालावलकर दशावतार मंडळ (ओसरगाव ) यांचे अर्धी गुरुदक्षिणा नाटक, रात्री ११ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, ५ रोजी ४.३० वाजता चेंदवणकर – गोरे दशावतारी मंडळ ( कवठी ,सुधाकर दळवी ) यांचे पाप गेले पुण्यापाशी नाटक, रात्री ११ वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धा ( लहान मुलांसाठी) ,६ रोजी सकाळी ८ वाजता श्रीदेवी महात्म ( प्राकृत सप्तशती ) या ग्रंथाचे संपूर्ण पठण ( या पठणात भाग घेणाऱ्यांनी एक दिवस पूर्वी केळबाई मंदिरात संपर्क साधावा ) सायंकाळीं ४.३० वाजता दत्तमाऊली दशावतारी मंडळ (सिंधुदुर्ग ) यांचे देवी चंद्रलांबा परमेश्वरी नाटक ,रात्री ११ वाजता श्रीदेवी केळबाई मित्रमंडळ ( कुडाळ ) यांची एकांकिका परतीची वाट, ७ रोजी दुपारी २.३० वाजता महालक्ष्मी प्रासादिक दिव्यांग बांधव मंडळ (कुडाळ )यांचे भजन, सायंकाळी ४ वाजता कलेश्वर दशावतारी मंडळ (नेरुर ,सुधीर कलींगण प्रस्तुत ) यांचे स्त्री नयना महिमा नाटक ,रात्री ११ वाजता सास्कृतिक कार्यक्रम,८ रोजी सायंकाळी ४ वाजता कुंकूमार्चन व हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ५ वाजता मंत्र जप ( सादरकर्ते – महिला मंडळ ,कुडाळ ) ६ वाजता सद्गुरु संगीत मंडळ (कुडाळ ) यांचे भजन,९ रोजी दुपारी २.३० वाजता विजयानंद म्युझिक क्लास (कुडाळ ) यांचा भक्तीगीत कार्यक्रम, सायंकाळी ४.३० वाजता मोरेश्वर दशावतारी मंडळ (मोरे ) यांचे दैव जाणिले कुणी नाटक , रात्री ११ वाजता अंध बांधव दिव्यसृष्टी भजन मंडळ ( सिंधुदुर्ग ) यांचे भजन , १० रोजी दुपारी ३ वाजता प्राथमिक शाळा ( कुडाळ – कुंभारवाडा ) यांचा सांस्कृतिक कार्यक्रम ,रात्री १० वाजता भगवती थिएटर्स ( मेढा – मालवण ) यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, ११ रोजी सायंकाळी ४ वाजता सत्यनारायण महापूजा , ४.१५ वाजता भजन,६ वाजता भजन, रात्री ११ वाजता कलेश्वर दशावतारी मंडळ ( नेरुर ,भाई कलिंगण प्रस्तुत ) यांचे महिमा माझ्या देवाचा नाटक, १२ रोजी सायंकाळी ५ वाजता विजयादशमी सोहळा, ६ वाजता खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम संपर्क मोबा. 9420907661, रात्री 11 वाजता आई केळबाई बाल मित्रमंडळ (कुडाळ) यांची एकांकिका आदी कार्यक्रम होणार आहेत .या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी केळबाई उत्सव मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे