देवगड | प्रतिनिधी
महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि आमदार श्री. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. कणकवली येथे होणाऱ्या भव्य मोर्चाचे देवगड तालुक्याचा नियोजन आढावा पडेल मंडळ कार्यालयात श्री. अजित कांबळे यांनी दोन्ही मंडळाचे अध्यक्षांच्या उपस्थितीत सविस्तर घेतला. मोर्चा यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी मेहनत घ्यावी असे आवाहन हि केले.
यावेळी देवगड मंडळ अध्यक्ष श्री. देवदत्त कदम आणि पडेल मंडळ अध्यक्ष श्री. विश्वनाथ पडेलकर यांनी कार्यकर्त्यांसह आपापल्या मंडळातील वाडीवस्त्यावर जाऊन प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचले आणि केलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. यावेळी अनिल पुरळकर, शैलेंद्र जाधव, पि.के. चौकेकर, दीपक कांबळे, इत्यादी कार्यकर्ते व आमदार साहेबांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते
