श्री देव कुडाळेश्वर मंदिरात ॲड. अभय देसाई स्मृती जिल्हास्तरीय भजन स्पर्धा उद्या ३ ऑक्टोंबर पासून सुरू

0

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त गुरुवार दि. ३ ऑक्टोंबर पासून ४९ व्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाने कै. ॲड. अभय देसाई स्मृती जिल्हास्तरीय भजन स्पर्धा घटस्थापनेच्या मुहूर्तावर आयोजन केले आहे.

गुरुवार ३ ऑक्टोंबर रोजी रात्री ८ वा. सकल मराठा समाजाचे अध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते अमेय देसाई, अमित सामंत, नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. स्पर्धेत सहभागी झालेली भजनमंडळे- ३ ऑक्टोबर रोजी महापुरुष प्रसादिक भजन मंडळ पिंगुळी, ४ ऑक्टोबर रोजी कुलस्वामिनी भजन मंडळ पावशी, ५ ऑक्टोबर रोजी श्रीदेवी माऊली भजन मंडळ इन्सुली, ब्राह्मण देव भजन मंडळ कुडाळ, उमळकर भजन मंडळ कुडाळ, ६ ऑक्टोंबर रोजी श्रीदेवी माऊली भजन मंडळ सासोली, ७ ऑक्टोंबर रोजी श्री देव भोमभजन मंडळ आंदुर्ले, श्री सातेरी कुडाळेश्वर कुलस्वामिनी भजन मंडळ पावशी, ८ ऑक्टोंबर रोजी श्री देव रवळनाथ भजन मंडळ पिंगुळी, स्वराभिषेक भजन मंडळ तांबुळी, ९ ऑक्टोंबर रोजी लिंगेश्वर भजन मंडळ गिरगाव, सद्गुरु प्रसादिक भजन मंडळ कुसबे, श्री स्वामी समर्थ भजन मंडळ कलंबिस्त, १० ऑक्टोंबर रोजी श्री लिंगेश्वर भजन मंडळ जानवली कणकवली, दत्तकृपा प्रसादिक भजन मंडळ वेंगुर्ला, काळंबा प्रसादिक भजन मंडळ डीगस, ११ ऑक्टोंबर रोजी श्री राम कृष्ण हरी सेवा संघ भजन मंडळ पाट, महापुरुष प्रसादिक भजन मंडळ पाट स्पर्धेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव मंडळाचे महेश कुडाळकर यांनी केले आहे.