पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून खासदार नारायण राणे यांनी १६ कोटी २९ लाख रुपयांचा दिला निधी ; सिंधुदुर्गातील सहा महत्त्वाचे रस्ते मंजूर 

0

खासदार नारायण राणे यांच्या शिफारसी नंतर तातडीने निधीची प्राप्त

पंतप्रधान ग्राम सडक मुळे अनेक गावे जोडली जाणार

 

कणकवली | प्रतिनिधी 

पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्ग चे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी शिफारस केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा कामांना भरघोस असा निधी प्राप्त झालेला आहे. १६ कोटी २९ लाख रुपयांचा निधी या योजनेतून मंजूर झालेल्या सहा रस्त्यांसाठी प्राप्त झाला आहे. अनेक ग्रामीण भागाला जाण्यासाठी दळणवळणाची व्यवस्था नव्हती,त्याचप्रमाणे या रस्त्यांमुळे अनेक गाव एका दुसऱ्याला थेट जोडले जाणार आहेत.

 यात मजूर रस्ते पुढील प्रमाणे आहेत,धालवली फणसगाव रोड तालुका देवगड, साठी ३ कोटी ७४ लाख, पडवणे पालये वाडातर तालुका देवगड, रस्त्यासाठी ३ कोटी ९६ लाख, नेतर्डे डोंगरपाल फकीरफाटा रस्ता तालुका सावंतवाडी, १ कोट ६०, आजगाव तिरोडा तालुका सावंतवाडी रस्त्यासाठी २ कोटी ३८ लाख, लोरे गडमठ रस्ता तालुका वैभववाडी साठी १ कोटी ८९ लाख,निवजे ओझरवाडी ते बामणदेवी मुळदे खुटवळवाडी रस्ता तालुका कुडाळ साठी २ कोटी ७२ लाख असा १६ कोटी २९ लाख रुपयांचा निधी दिला आहे.


जाहिरात

तृतीय स्मृतिदिन

भावपूर्ण श्रद्धांजली

कै.रामचंद्र मंगेश उर्फ आबा मुंज

मृत्यु दि.4/10/2021 

माजी वित्त व बांधकाम सभापती

——————————–

आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहिल

——————————

पत्नी श्रीम.रेखा रामचंद्र मुंज

 भाऊ -श्री.संतोष मुंज, अण्णा मुंज

भावजय – श्रीम.रसिका मुंज, सौ.वनिता मुंज, सौ.सोनिया मुंज,

बहीणी – सौ.सुगंधा म्हाडेश्वर, सौ.ईजा वाळके, सौ.कांचन कर्पे, 

पुतणे -कु.चिराग मुंज, हर्ष मुंज, श्लोक मुंज

पुतण्या -चैत्राली मुंज, रोहीणी मुंज

कै.आबा मुंज, गुरु मुंज वेलफेअर फाउंडेशन ग्रुप घावनळे सदस्य तालुका कुडाळ