कणकवली | प्रतिनिधी
कणकवली शहराच्या सौंदर्यकरणात दिवसेंदिवस भर पडत असतानाच आता कणकवली रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या नरडवे रोडच्या सुशोभीकरणात देखील आता भर पडली आहे. कणकवली नगरपंचायतमध्ये सत्ता काळात आमदार नितेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यातून प्रस्तावित केलेले स्कल्पचर बसविण्याचे काम अखेर पूर्ण झाले. या कामाचा लोकार्पण सोहळा आज कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत तसेच जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादा कुडतरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आ. नितेश राणे म्हणाले, कणकवली शहराचा दर्जेदार विकास झाला पाहिजे यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे देखील सातत्याने पाठपुरावा करत असतात. आम्ही सातत्याने कणकवली शहराचा दर्जा व विकास कामांसाठी प्रयत्न करत असतो. सुशोभीकरणाच्या दृष्टीने कणकवली शहर अग्रेसर आहे. असे त्यांनी सांगितले.
