सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
कोकण रेल्वे कामगारांची मान्यताप्राप्त युनियनसाठी गुप्त मतदान पद्धतीने मतदान प्रक्रीया पूर्ण झाली. सदर मतदान महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यातील एकूण 22 मतदान केंद्रांवर मतदान झाले. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण होत असताना ते स्वतंत्र कोकण रेल्वे झोन करून व्हावे अशी के. आर. सी. युनियनची मागणी असून या महत्त्वाच्या मुद्द्याला अनुसरून तसेच कोकण रेल्वेचे मॉनिटायझेशनचा डाव हाणून पाडण्यात के. आर. सी. युनियनला यश आले व कोकण रेल्वे कामगारांच्या अनेक मागण्या मान्य करून घेण्यात के. आर. सी. एम्प्लॉईज युनियनला आलेल्या यशाच्या आधारे ही निवडणूक लढवली गेली. मागच्या पंधरा दिवसात महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यात विविध सभांमधून मिळत असलेला कामगारांचा पाठिंबा मिळाला असून के. आर. सी. एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष सुभाष मळगी यांचे नेतृत्व तसेच कोकण रेल्वे एम्प्लॉईज संघचे अध्यक्ष श्री. मिलिंद तुळसकर व कार्याध्यक्ष श्री. नरेंद्र शिंदे यांचे नेतृत्व, के.आर.सी. चे कार्यकर्ते यांचा पाठिंबा त्याचबरोबर एस. सी. एस. टी. असोसिएशनचा पाठिंबा या सर्वांची साथ लक्षात घेता के.आर.सी. एम्प्लॉईज युनियनचा विजय निश्चित आहे याची खात्री आहे.
