देवगड | प्रतिनिधी
जामसंडे दिर्बादेवी स्टॉप नजीक पादचाऱ्याला ठोकर दिल्याप्रकरणी मोटर सायकल स्वार महेश कृष्णा लब्दे (वय ३९, रा. जामसंडे पाटकरवाडी) यांच्याविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामसंडे शांतीनगर येथील रहिवासी किशोर बबन मोरे हे दि. ४ ऑक्टोंबर रोजी सकाळी देवगड येथे कामानिमित्त आले होते .काम आटपून ते घरी जात असताना सकाळी ८:३० च्या सुमारास जामसंडे दिर्बादेवी स्टॉप नजीक असलेल्या घाडी कोल्ड्रिंक जवळ पाटकरवाडी येथून जामसंडे येथे वेगाने येणाऱ्या मोटरसायकलची धडक त्यांना बसल्याने अपघात झाला. या अपघातात किशोर मोरे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी गोवा बांबुळी येथे त्यांना हलविण्यात आले आहे. या अपघात प्रकरणी त्यांची पत्नी सौ सीमा किशोर मोरे यांनी देवगड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी भरगाव वेगाने हयगईने, बेदरकारपणे मोटरसायकल चालवून किशोर मोरे यांना धडक देत त्यांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटर सायकलस्वार महेश कृष्णा लब्दे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतच्या अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल उदय शिरगावकर करत आहेत.
