कुडाळ | प्रतिनिधी
श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्या वतीने श्री देव कुडाळेश्वर कीर्तन महोत्सव शनिवार १२ ऑक्टोंबर ते बुधवार १६ ऑक्टोंबर पर्यंत दररोज रात्री ८:३० वा. श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथे होणार आहे. या कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन दसऱ्या दिवशी होणार आहे.
या कीर्तन महोत्सवामध्ये शनिवार १२ ऑक्टोंबर रोजी माजलगाव येथील ह. भ. प. लक्ष्मीप्रसाद पटवारी-कुलकर्णी (विषय- समर्थभक्त अज्ञान), रविवार १३ ऑक्टोंबर रोजी पुणे येथील ह. भ. प. सौ. प्रज्ञा देशपांडे-पळसोदकर (विषय संत सखुबाई), सोमवार १४ ऑक्टोंबर रोजी डोंबिवली येथील ह. भ. प. मोहक रायकर (विषय- माहूरची रेणुका माता), मंगळवार १५ ऑक्टोंबर रोजी पुणे येथील ह. भ. प. विश्वास कुलकर्णी (विषय- कविराज भूषण), बुधवार १६ ऑक्टोंबर रोजी पुणे येथील ह. भ. प. रेशीम खेडेकर (विषय- नाथांना दत्त दर्शन) अशी पाच दिवस भजने होणार आहे तरी भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
