कुडाळात कीर्तन महोसवाचा शुभारंभ

0

श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे आयोजन

कुडाळ | प्रतिनिधी 

विजयादशमी पासून श्री देव कुडाळेश्वर कीर्तन महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या कीर्तन महोत्सवाचे उदघाटन शनिवार दि. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्रौ ९ वा. कीर्तन महोत्सवाचे सर्व प्रायोजकाचे हस्ते करण्यात आले.

यावेळी श्री. सावंत प्रभावळकर कुटुंबियाच्या वतीने श्री. राजू सावंत- प्रभावळकर, आणि विलास राणे, सांगिर्डेवाडी , सदासेन सावंत उपस्थित होते. त्यांचे स्वागत मंडळाचे कार्यकर्ते सुशिल परब, गजा घाटकर व प्रतिक राऊळ यानी पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर ह.भ.प.श्री. लक्ष्मी प्रसाद कुलकर्णी यांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष किशोर काणेकर काणेकर यानी केले. तसेच संगीतसाथ कलाकाराचे स्वागतही किशोर काणेकर यानी केले.

 त्यानंतर ह.भ.प. लक्ष्मीप्रसाद कुलकर्णी आणि राजू सावंत प्रभावळकर, सदासेन सावंत यानी आणि विलास राणे यानी ज्ञानेश्वर माऊली व श्री विठ्ठलाचे पूजन करून दिप प्रज्वलन करून १६ व्या कीर्तन श्री देव कुडाळेश्वर कीर्तन महोत्सवाचे उद्‌घाटन केले. 

कीर्तनाला हार्मोनियम साथ बाळकृष्ण उर्फ पप्पू नाईक, तबला साथ सिध्देश कुंटे, पखवाजसाथ आबा मेस्त्री यांची पाचही दिवस लाभणार आहे. आजच्या कीर्तन महोत्सवाच्या पहिले कीर्तन ह.भ.प. लक्ष्मी-प्रसाद शंकरराय कुलकर्णी यानी संत जगद्‌गुरु श्री तुकाराम महाराजांचा “क्षणी क्षणी हाची करावा विचार । तरावया पार हा भवबिंधू ॥ हा पूर्वरंगाकरीता अभंग घेऊन सुरुवात केली. तर उत्तररंगामध्ये समर्थभक्त अज्ञाना अज्ञान ही कथा सांगितली. श्री बुवानी अत्यंत रसाळवाणीत उत्तम कीर्तन केले. कीर्तनाला रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. कोजागिरी पौर्णिमेला या कीर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे.