भाजपा नेते निलेश राणे यांनी घेतली जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट

0

ई-पीक पहाणी, आंबडपाल देवस्थान इमान जमिनीबाबत वेधले लक्ष

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी

भाजपा नेते निलेश राणे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील यांची भेट घेतली, यावेळी आंबडपाल देवस्थान इमान जमीन संदर्भातील बैठक लवकरात लवकर घेऊन आंबडपाल जमीन प्रश्न निकालात काढण्यासंदर्भात चर्चा त्या सोबतच खरीप हंगामातील ई-पीक पहाणी मुदतवाढ देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. यावेळी कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, माजी जि. प. अध्यक्ष, दिपलक्ष्मी पडते, संदेश नाईक, गौरव घाडीगांवकर, जयेश चिंचळकर, शुभम परब आदी उपस्थित होते.