Sunday, June 21, 2026
Google search engine
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर सिंधुदुर्गातील साहित्यिकांची वर्णी

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर सिंधुदुर्गातील साहित्यिकांची वर्णी

मुंबई | वृत्तसेवा 

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिक वामन पंडित, महेश केळुसकर, महादेव देसाई, वृंदा कांबळी व डॉ. शरयू आसोलकर यांची निवड झाली आहे याबाबत महाराष्ट्र शासनाने या मंडळाला मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर विविध क्षेत्राशी संबंधित अध्यक्ष व २४ सदस्य अशा एकूण २५ सदस्यांची निवड केली जाते ही निवड तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात येते. त्यानुसार पुढील तीन वर्षासाठी नव्या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे, उपाध्यक्षपदी केशव उपाध्ये तसेच सिंधुदुर्गातून सदस्य म्हणून साहित्यिक वामन पंडित, महेश केळुसकर, महादेव देसाई, वृंदा कांबळी व डॉ. शरयू आसोलकर यांची निवड करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!