सर्व सोशल मिडीया ग्रुप अॅडमीन व सभासद यांना कुडाळ पोलीस ठाण्यातून जाहीर केल्या नोटीसा 

0

कुडाळ | प्रतिनिधी 

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) २०२३ चे कलम १६८ नुसार सर्व सोशल मिडीया ग्रुप अॅडमीन व सभासद यांना कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी नोटीस जाहीर केली आहे. 

या नोटिशीमध्ये असे म्हटले आहे की, कोणत्याही उमेदवाराशी संबंधीत त्याचे वैयक्तिक, कौटुंबिक अगर सामाजिक स्तरावर अवहेलना होईल अशी आक्षेपार्ह टिकाटिपणी करणे, मजकूर, फोटो, व्हिडीओ (एडीट/माफींग करुन) प्रसारीत करणे, स्टेटस लावणे अथवा आलेल्या संदेशावर स्वतः आक्षेपार्ह मजकूर प्रकट करणे व पुढे पाठविणे, मतदाराचे मन वळविण्यासाठी कोणत्याही धर्माच्या लोकांच्या धार्मिक, भाषिक तसेच जातीय द्वेष पसरविणारे आक्षेपार्ह मजकूर, फोटो, व्हिडीओ (एडीट/माफींग करुन) प्रसारीत करणे, निवडणूकीचे पार्श्वभूमीवर राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होईल अशा प्रकारचे स्वतंत्र मिडीया ग्रुप निर्माण करुन त्याद्वारे आक्षेपार्ह मजकूर, फोटो, व्हिडीओ (एडीट/माफींग करुन) प्रसारीत करणे, अथवा कृत्य करणे, कुठल्याही सोशल मिट्टीया ग्रुपमध्ये आचारसंहितेचा भंग होईल अशा अथवा दोन गटात वाद होईल अशी पोस्ट, अथवा मजकूर, फोटो, व्हिडीओ टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत व्यक्तिसह ग्रूप अॅडमीन जबाबदार असणार आहे. त्याकरीता अॅपची सेटींग चेंज करुन ओनली फॉर अॅडमीन करुन घ्यावी असे नोटीसी मध्ये म्हटले आहे.