आमदार वैभव नाईक यांची जंगम व स्थावर अशी एकूण ३२ कोटी ५८ लाख ३२ हजार ५९९ रूपये संपत्ती

0

जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्यात पाच फौजदारी खटले प्रलंबित

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आपला आगामी विधानसभेसाठी निवडणूक अर्ज दाखल केला. यामध्ये त्यांनी जंगम व स्थावर अशी एकूण ३२ कोटी ५८ लाख ३२ हजार ५९९ रू संपत्ती नमूद केली आहे. त्यांच्यावर जिल्ह्यातील तिन पोलिस ठाण्यात पाच फौजदारी खटले प्रलंबित आहेत. अशी माहिती कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. गुरुवारी या प्रक्रियेतील शुभारंभ आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. दाखल केलेल्या अर्जात त्यांनी आपल्या स्थावर व जंगल मालमत्तेचे विवरण दाखवले आहे यानुसार जंगम मालमत्तेमध्ये त्यांनी स्वतःचे नावे ७ कोटी ३१ लाख २ हजार २१५ रू. तर पत्नीच्या नावे ३ कोटी ९२ लाख ८३ हजार ८४ रू. तर सामायिक मालमत्तेपैकी ९ लाख ८६ हजार ७५४ रू एवढ्या मालमत्तेचे विवरण दाखवले आहे. यामध्ये फॉर्च्यूनर कार, स्कॉर्पिओ, जेसीबी या मालमत्तेचे ४३ लाख ३० हजार ९२४ रू. त्यांच्याकडे स्वतःकडे २८१ ग्राम सोने असून त्याची किंमत २२ लाख ६२ हजार ८५८ रू. तर पत्नीकडे ४११ ग्राम सोने असून त्याची किंमत ३४ लाख ९७ हजार १२२ रुपये आहे. त्यांना पत्नी व स्वतःचे नावाने ९१ लाख ७० हजार ३८१ रू कर्ज आहेत. तर स्थावर मालमत्तेमध्ये स्वतःच्या नावे शेतजमीन, घर अशा स्वरूपाच्या मालमत्तेचे ११ कोटी ३९ लाख , ८० हजार ३०० रू तर पत्नीचे नावे २ कोटी ५२ लाख ५१ हजार, तर सामायिक मालमत्तेत ७ कोटी ६० लाख रुपये एवढी मालमत्ता आहे. आमदार वैभव नाईक यांच्यावर एकूण पाच प्रलंबित फौजदारी खटले आहेत. यामध्ये कुडाळ पोलीस स्टेशन येथे ३, कणकवली पोलीस ठाण्यात १ तर मालवण पोलीस ठाण्यात एक अशा ५ फौजदारी खटल्यांचा समावेश आहे अशी माहिती कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.