कडाडलेल्या विजेच्या धक्क्याने माय लेक जखमी 

0

 

कुडाळ | प्रतिनिधी 

परतीच्या कोसळणाऱ्या पावसामध्ये कडाडलेल्या विजेचा धक्का निवजे येथील माय लेकीला बसला यामध्ये मायलेकी किरकोळ जखमी झाल्या त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

परतीच्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणावर विजेचा कडकडाट होत आहे आज (बुधवारी) सायंकाळी झालेल्या विजेच्या कडकडाटामध्ये निवजे येथे या विजेच्या कडकडाटाचा धक्का २८ वर्षीय सुवर्णा विकास जाधव व त्यांची ३ वर्षीय लेक धृवेश विकास जाधव याला बसला यामध्ये मायलेक जखमी झाले त्यांना उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे याबाबत जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधला असता मायलेकी यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले.