ओरोस डॉन बॉस्को हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक फादर लिनो लोपिस यांचे झाले निधन 

0

गोवा येथे उद्या शुक्रवारी केले जाणार अंत्यसंस्कार 

ओरोस | प्रतिनिधी 

ओरोस डॉन बॉस्को हायस्कुल या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक फादर लिनो लोपिस यांचे हुबळी कर्नाटक येथे हृदयविकाराने निधन झाले.

सन २००७ ते २०१२ या कालावधीत त्यांनी डॉन बॉस्को शाळेचे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सांभाळला. त्यांच्या मनमिळाऊ व साध्या स्वभावामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक यामध्ये ते अतिशय लोकप्रिय होते. त्यांच्या काळात डॉन बॉस्कोच्या प्री प्रायमरी विभागाचे नूतन बिल्डिंग बांधकाम केले. त्यानंतर ते तुये गोवा येथे कार्यरत होते. त्यानंतर पुंन्हा सन २०१६ पासून ते कुडाळ व पिंगुळी पॅरिसचे मुख्य धर्मगुरू व रेक्टर म्हणून कार्यरत होते. त्यांनी ओरोस ख्रिश्चनवाडी येथील जुने चॅपल म्हणजेच प्रार्थना मंदिर पाडून नवीन बांधण्याचे फार मोठे कार्य केले. आपल्या परिचयाच्या गोवा कर्नाटक येथील दानशूर व्यक्तींची मदत घेऊन भव्य दिव्य असे प्रार्थना मंदिर बांधले. गोरगरिबांना मदत करणे त्यांच्या रक्तात होते. रानबांबूळी व नेरूर येथील चर्च साठी सुद्धा फार योगदान दिले. त्यांच्या निधनाने ओरोस डॉन बॉस्कोचा शिक्षक पालक, विद्यार्थी वर्ग तसेच ख्रिस्ती बांधवांमध्ये शोककळा पसरली. उद्या दि. १ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता डॉन बॉस्को चर्च, पणजी येथे त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवले जाणार आहे व मिसा बलिदान नंतर त्यांचे शव गोवा फातोर्डा मडगाव येथे दफनविधीसाठी नेण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्याने शैक्षणिक तसेच सामाजिक फार मोठे नुकसान झाले आहे.