कुडाळ | प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन शनिवारी कुडाळ येथील ठाकरे शिवसेना शाखा येथे ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शाखेजवळ महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांचे प्रचार कार्यालय करण्यात आले आहे. या प्रचार कार्यालयाचे उदघाटन माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते फित कापून व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, नागेंद्र परब, अतुल बंगे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महिला जिल्हा संघटक सौ.श्रेया परब, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर परब, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, विद्याप्रसाद बांदेकर, युवक विधानसभा अध्यक्ष मंदार चंद्रकांत शिरसाट, विभागप्रमुख दीपक आंगणे, गंगाराम सडवेलकर, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका सौ.श्रेया गवंडे, सौ.सई काळप, सौ.श्रुती वर्दम, सौ.ज्योती जळवी, सचिन काळप, महिला आघाडी तालुका संघटक सौ.स्नेहा दळवी व सौ.मथुरा राऊळ, बाळा कोरगावकर, सचिन कदम, संतोष शिरसाट, आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
