कणकवली | प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे १३ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. सावंतवाडीचे उमेदवार राजन तेली, कणकवलीचे उमेदवार संदेश पारकर, कुडाळ चे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारासाठी ते तीन सभा घेणार आहेत. यात दुपारी ११.३० वाजता सावंतवाडी गांधी चौक, दुपारी २.३० वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयात समोर, त्यानंतर सायंकाळी ४ वाजता मालवण टोपीवाला हायस्कूल पटांगणावर सभा होणार आहे, अशी माहिती माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्याही सभा होणार आहेत, अशी माहिती परशुराम उपरकर यांनी दिली.
