कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक कमी मतदान सिंधुदुर्गनगरी बुथ क्र. १५३ येथे ४३.८६ टक्के तर सर्वाधिक जास्त मतदान आमडोस बुथ क्र. ६८ येथे ८८.५९ टक्के

0

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७२.४४ टक्के एवढे मतदान झाले. यात एकूण २७९ बुथांपैकी सर्वाधिक कमी मतदान सिंधुदुर्गनगरी बुथ क्रमांक १५३ येथे ४३.८६ टक्के तर सर्वाधिक जास्त मतदान आमडोस बुथ क्रमांक ६८ येथे ८८.५९ टक्के झाले आहे.

कुडाळ – मालवण मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी २ लाख १७ हजार १८६ मतदारांपैकी ८१ हजार ५८४ पुरूष तर ७५ हजार ७३९ महीला अशा एकूण १ लाख ५७ हजार ३२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरूष मतदारांचे ७५.५७ टक्के तर महिला मतदारांचे ६९.३४ टक्के एवढे मतदान झाले. या मतदार संघातून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार वैभव विजय नाईक, महायुतीकडून शिंदे शिवसेनेचे निलेश नारायण राणे,महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून अनंतराज नंदकिशोर पाटकर, बहुजन समाज पार्टी कडून रविंद्र हरिश्चंद्र कसालकर,अपक्ष उमेदवार उज्वला विजय येळाविकर या  पाच उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. दरम्यान शनिवार दि.२३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

या मतदारसंघातील एकूण २७९ मतदान केंद्रावर मतदान प्रकिया पार पडली. यात सर्वाधिक कमी मतदान कुडाळ तालुक्यातील सिंधुदुर्गनगरी केंद्र क्रमांक १५३ येथे ४३.८६ टक्के व सिंधुदुर्गनगरी केंद्र क्रमांक १५२ येथे ४५.७८ टक्के एवढे झाले. तर सर्वाधिक मतदान मालवण तालुक्यातील आमडोस केंद्र क्रमांक ६८ येथे ८८.५९ टक्के, त्यापाठोपाठ कुडाळ तालुक्यातील केरवडे कर्याद नारूर केंद्र क्रमांक १८८ येथे ८८.३९ टक्के एवढे झाले आहे. ८० टक्के पेक्षा जास्त मतदान दोन्ही तालुक्यात मिळून ३३ केंद्रावर झाले आहे. यात मालवण तालुका – बुधवळे केंद्र क्रमांक ३ येथे ८३.३० टक्के, वडाचापाट केंद्र क्रमांक ३९ येथे ८३.९० टक्के, राणे शेमडावाडी केंद्र क्रमांक ५८ येथे ८०.६० टक्के, तोंडवली तळाशील केंद्र क्रमांक ६२ येथे ८१.११ टक्के, ओझर केंद्र क्रमांक ६३ येथे ८०.८७ टक्के, सर्जेकोट केंद्र क्रमांक ६६ येथे ८४.२४ टक्के, आमडोस केंद्र क्रमांक ६८ येथे ८८.५९ टक्के, चौके केंद्र क्रमांक ८८ येथे ८७.७० टक्के, घुमडे केंद्र क्रमांक ९२ येथे ८१.४३ टक्के, मालवण एनपी केंद्र क्रमांक १०५ येथे ८२.७५ टक्के, वायरी केंद्र क्रमांक १०९ येथे ८०.२३ टक्के, वायरी केंद्र क्रमांक १११ येथे ८१.५२ टक्के, तारकर्ली केंद्र क्रमांक ११३ येथे ८०.९६ टक्के, देवबाग केंद्र क्रमांक ११६ येथे ८१.०४ टक्के, पडवे केंद्र क्रमांक १४६ येथे ८०.४४ टक्के.

कुडाळ तालुका – गिरगाव केंद्र क्रमांक १५९ येथे ८०.८९ टक्के, अणाव केंद्र क्रमांक १६९ येथे ८१.७२ टक्के, बाव केंद्र क्रमांक १७२ येथे ८३.३६ टक्के, नारूर कर्याद नारूर केंद्र क्रमांक १८१ येथे ८२.७१ टक्के, केरवडे कर्याद नारूर 88.39 टक्के, निळेली केंद्र क्रमांक १८९ येथे ८०.५५ टक्के, निवजे केंद्र क्रमांक १९१ येथे ८१.२० टक्के, पावशी केंद्र क्रमांक १९५ येथे ८०.१५ टक्के, पाट केंद्र क्रमांक २०४ येथे ८३.७३ टक्के, आंबडपाल केंद्र क्रमांक २३२ येथे ८१.७७ टक्के, तुळसुली तर्फ माणगाव केंद्र क्रमांक २३५ येथे ८२.६६ टक्के, आंबेरी केंद्र क्रमांक २३८ येथे ८२.५४ टक्के, मोरे केंद्र क्रमांक २४२ येथे ८५.८६ टक्के, कांदुळी केंद्र क्रमांक २४३ येथे ८३.५० टक्के, कालेली केंद्र क्रमांक २४४ येथे ८२.४१ टक्के, आंदुर्ले केंद्र क्रमांक २६५ येथे ८१.१२ टक्के, पाट मुणगी केंद्र क्रमांक २६७ येथे ८२.९१ टक्के, तेंडोली केंद्र क्रमांक २६९ येथे ८१.११ टक्के, वाडीवरवडे केंद्र क्रमांक २७१ येथे ८०.८१ टक्के, झाराप केंद्र क्रमांक २७६ येथे ८३.४५ टक्के असे मतदान झाले. तसेच १६६ केंद्रांवर ७० टक्के पेक्षा जास्त तर ६८ केंद्रांवर ६० टक्के पेक्षा जास्त मतदान झाले आहे.